CSK Vs MI: चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा 33 वा सामना खेळण्यात आला. या रोमांचक सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजाचं कंबरडं मोडणाऱ्या चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पण माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. हा सामना चेन्नईच्या हातातून निसटत आहे असं दिसत असताना धोनीनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात धोनीनं 215.38 स्ट्राईक रेटनं 13 चेंडूत 28 धावा केल्या. ज्यात तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. 


याआधी प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आलेला महेंद्रसिंह धोनी त्याच्या जुन्या शैलीत दिसला. विकेटच्या मागे उभा असताना धोनीनं अनेकदा आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले आहेत. या हंगामात धोनी चेन्नईचं नेतृत्व करत नाही. पण अनेकदा तो विकेटच्या मागे निर्णय घेताना दिसला आहे. कालच्या सामन्यातही धोनीनं पोलार्डला आऊट करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्यानंतर दुसऱ्याचं चेंडूवर पोलार्डनं विकेट्स गमावली. 


व्हिडिओ-



पोलार्डला आऊट करण्यासाठी धोनीचा प्लॅन यशस्वी ठरला
पोलार्डच्या रुपात मुंबईच्या संघाला सहावा झटका बसला. 21 वर्षाचा युवा फिरकीपटू महेश तिक्षणानं आपल्या जाळ्यात अडकवलं. मुंबईच्या डावातील सोळाव्या षटकात रवींद्र जाडेजानं महेश तिक्षणाच्या हातात चेंडू सोपावला. या षटकातील पहिला चेंडूवर एक धाव काढून तिलक वर्मानं पोलार्डला स्ट्राईक दिली. त्यानंतर धोनीनं फिल्डिंग सेट केली. दुसऱ्या चेंडूवर पोलार्डनं फटका मारला. पण सीमारेषाजवळ असलेल्या शिवम दुबेनं झेल पकडून पोलार्डला माघारी धाडलं.


धोनीची दमदार कामगिरी
जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीनं मुंबईविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवला. 18 चेंडूत 42 धावांची गरज असताना धोनीने आपल्या स्टाईलनं सामना फिरवला. बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीनं कोणतीही रिस्क घेतली नाही. उनादकटच्या गोलंदाजीवर धोनीने धावांचा पाऊस पाडला. धोनीने 13 चेंडूत 28 धावांची खेळी करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. 


हे देखील वाचा-