Chandrashekhar Bawankule : राज्यात जवळपास 15 लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज पुरवठा मिळत आहे. आदिवासी भागात सर्वात जास्त प्रमाणात भारनियमन होत आहे. वित्तमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असल्याची टीका भाजपचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकार कोळसा खरेदी करु शकले नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले जात असल्याचे बावनकुळे म्हणाले. 


सध्या राज्यात वीज टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भारनियमन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच मुद्यावरुन विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. राज्य सरकार कोळसा खरेदी करु शकले नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले जात असल्याचे म्हणच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकही तासाचे भरनियमन केले गेले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले.  मात्र, महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करीत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.


राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला


यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारने हे ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात वाचवले पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय समर्थन दिले. कायदा मंजूर करुन दिला. मात्र, या सरकारने दोन वर्षे केवळ टाईमपास करुन ओबीसी आरक्षणाचा बट्याबोळ केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ओबीसीकरता मंजूर केलेला कायदा टिकवला पाहिजे. हा कायदा ओबीसीकरता कसा योग्य आहे हे पटवून देणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाने वेळ दिला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पाच ते सहा महिने पुढे जातील, नाहीतर निवडणुका वेळेवर होतील. निवडणुका कधी होऊद्या भाजप यासाठी तयार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  


महत्त्वाच्या बातम्या: