MI vs CSK IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings Vs Mumbai Indians) आमने-सामने आले. या सामन्यात चेन्नईच्या संघानं मुंबईवर तीन विकेटस् राखून विजय मिळवला. चेन्नईच्या विजयात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं  (MS Dhoni) मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकातील चार चेंडूत चेन्नईला विजयासाठी 16 धावांची गरज असताना महेंद्रसिंह धोनीनं मुंबईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला. चेन्नई आणि मुंबई सामन्यातील अखेरच्या षटकातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईच्या संघानं मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दरम्यान, तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. मुंबईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघानं 16 धावात दोन विकेट्स गमावले. त्यानंतर रॉबिन उथप्पा (30 धावा) आणि अंबाती रायडूनं (40 धावा) संयमी खेळी दाखवत संघाचा डाव सावरला. दरम्यान, चेन्नईच्या संघाला विजयासाठी 24 चेंडूत 48 धावांची गरज होती आणि त्यांनी सहा विकेट्स गमावले होते. त्यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या धोनी आणि प्रिटोरियसनं प्रत्येकी दोन- दोन धावा केल्या होता. त्यानंतर दोघांनीही आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. ज्यामुळं चेन्नईचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला. 


अखेरच्या षटकात काय घडलं?
सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईच्या संघाला 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. मात्र, या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रिटोरियस बाद झाला. त्यानंतर चेन्नईला सामना जिंकून देण्याची संपूर्ण जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आली. चेन्नईला विजयासाठी चार चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर धोनीनं पहिला षटकार मारला, मग चौकार, त्यानंतर दोन धावा काढून त्यानं स्ट्राईक स्वत:जवळ ठेवली. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना धोनीनं चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.


आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ कितव्या क्रमांकावर
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील चेन्नईचा दुसरा विजय आहे. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे. तर, सातही सामने गमावलेला मुंबईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. 


व्हिडिओ- 



हे देखील वाचा-


CSK vs MI: कोण आहे मुकेश चौधरी? ज्यानं मुंबईच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं


IPL 2022:  बाबा! बटलरसारखं शतक का ठोकत नाहीत? डेव्हिड वार्नरच्या कामगिरीवर मुलगी नाराज


Wisden Cricketer of the year: 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर'ची घोषणा, पाच क्रिकेटपटूंमध्ये दोन भारतीय