Who is Mukesh Choudhary: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 30 सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings Vs Mumbai Indians) आमने सामने आले आहेत.  चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना हा आयपीएलचा सर्वात मोठा सामना असल्याचं म्हटलं जातं. यामुळं आजचा सामनाही रोमांचक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, चेन्नईचा युवा गोलंदाज मुकेश चौधरीनं (Mukesh Choudhary) त्याच्या पहिल्याच षटकात मुंबईच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. त्यानंतर ज्युनियर एबी डिव्हिलियर्स ब्रेविसलाही त्यानं आपल्या जाळ्यात अडकवलं. मुंबईच्या टॉप फलंदाजाला पव्हेलियनमध्ये पाठवणारा मुकेश चौधरी कोण आहे? त्याच्याविषयी जाणून घेऊयात.


लखनौविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण
मुकेश चौधरी गेल्या वर्षी चेन्नईच्या संघात सामील झाला होता. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. तो नेट बॉलर म्हणून संघात होता. परंतु, चेन्नईचा गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळं बाहेर गेल्यानं संघ व्यवस्थापनानं मुकेश चौधरीला लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली. आज मुंबईविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्यानं उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. 


मु्केश चौधरीची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी
मुकेश चौधरीनं सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो लोकांच्या नजरेत आला होता. मुकेश चौधरी हा राजस्थानच्या भिलवाडा येथील रहिवासी आहे. तो अनेक संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. विशेष म्हणजे, मुकेश चौधरीला चेन्नईच्या संघानं त्याची मूळ किंमत 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. 


हे देखील वाचा-