एक्स्प्लोर

वंशभेदाच्या टीकेला कंटाळून मेसूतचा जर्मन फुटबॉल टीमला बाय बाय

2014 च्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा प्रमुख शिलेदार आणि आधारस्तंभ मेसूत ओझिलनं जर्मन फुटबॉल संघाला गुड बाय केलं आहे. ओझिलच्या या निर्णयामुळे फुटबॉलविश्वात सध्या खळबळ माजली आहे.

बर्लिन : 2014 च्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा प्रमुख शिलेदार आणि आधारस्तंभ मेसूत ओझिलनं जर्मन फुटबॉल संघाला गुड बाय केलं आहे. ओझिलच्या या निर्णयामुळे फुटबॉलविश्वात सध्या खळबळ माजली आहे. जर्मनीच्या चाहत्यांकडून होत असलेल्या सततच्या वंशभेदी टीकेमुळे 29 वर्षीय ओझिलनं ट्विटरवरुन निवृत्तीची घोषणा केली. मे महिन्यात झालेल्या इंग्लिश प्रिमीयर लीगदरम्यान तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप इर्डोगन यांनी आर्सेनलचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ओझिलची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी ओझिलचा तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतचा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. मुळात ओझिल आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष इर्डोगन दोघंही टर्कीश-जर्मन वंशाचे असल्यानं जर्मन चाहते आणि माध्यमांना ओझिलची ही कृती पचली नाही. त्यामुळे ओझिलला माध्यमं आणि नेटिझन्सकडून वांशिक शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. ओझिलनं मात्र यावर मौन बाळगताना इंग्लिश प्रिमीयर लीगनंतर विश्वचषकावर आपलं लक्ष्य केंद्रित केलं. पण विश्वचषकात जर्मनीला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर जर्मन चाहत्यांनी ओझिलवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. आपल्यावर होणाऱ्या सततच्या टीकेमुळे अखेर ओझिलनं मौन सोडत यापुढे जर्मनीसाठी खेळणार नसल्याचं जाहीर केलं. आक्रमक मिडफिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझिलनं गेल्या नऊ वर्षात जर्मनीसाठी भरीव योगदान दिलं होतं. जर्मनीकडून आजवर 92 सामन्यात खेळताना त्यानं 23 गोल नोंदवले होते तर 40 गोल्ससाठी सहाय्य केलं होतं. 2014 साली चौथ्यांदा विश्वविजेता ठरलेल्या जर्मन संघाचा ओझिल हा महत्वाचा शिलेदार होता. याशिवाय जर्मनीच्या सर्वोत्तम फुटबॉलवीरासाठी देण्यात येणारा प्लेयर ऑफ द ईयर पुरस्कार ओझिलं पाच वेळा पटकावला होता. त्यामुळे ओझिलच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे जर्मनीसह अवघे फुटबॉलविश्व हादरले आहे.    

महत्त्वाच्या बातम्या

Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
IND Vs WI 5th T20I : BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
BCCIची मोठी घोषणा! शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या Squadमध्ये अचानक बदल, स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार IN, मग कोण झालं OUT?
Ind vs Nz ODI Squad : रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
रोहित-विराटच्या जोडीला जैस्वाल, सूर्यांश शेडग; न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य टीम इंडिया, नव्या-जुन्या पिढीचा ताळमेळ, चक्रावणारा Squad
IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget