Manu Bhaker: मनू भाकरनं भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं मिळवून दिली आहेत. 10 मीटर एअर पिस्टल आणि मिश्र दुहेरीमध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे. मनू भाकरचं 25 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारातील कांस्य पदक थोडक्यात हुकलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक सुरु असतानाच नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं होतं. आता मनू भाकरने तिच्या आवडत्या क्रिकेटपटूंची नावं सांगितली आहे. 


एका मुलाखतीत मनू भाकरने (Manu Bhaker) तिच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे नाव जाहीर केले आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त मनू भाकरने आणखी दोन आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंची नावं घेतली. तुझा आवडता खेळाडू कोण?, असा प्रश्न मनू भाकरला विचारण्यात आला. यावर सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली हे त्याचे आवडते खेळाडू आहेत, असं मनू भाकरने सांगितले. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासोबत एक तासही घालवणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल, अशी इच्छा मनू भाकरने व्यक्त केली. 






मनू भाकरचे गावात जल्लोषात स्वागत-


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकणारी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिचे रविवारी हरयाणातील तिच्या गोरिया गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मनूने पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्टल आणि सरबजोत सिंह याच्यासोबत 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य जिंकले होते. स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय ठरली. मनू गावातील शाळेतही गेली. यावेळी मनूने गावात एक स्टेडियम व शूटिंग रेंज स्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.


कोण आहे मनू भाकर?


22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.


मनू भाकरची संपत्ती किती?


मनू भाकरची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक जिंकल्यानंतर तिला अनेक ब्रँडचे ॲम्बेसेडर देखील बनवण्यात आले आहे. मनू भाकरने आतापर्यंत 34 पदके जिंकली आहेत. यामध्ये 24 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने एकट्याने नेमबाजीत दोन पदके जिंकून इतिहास रचला.


संबंधित बातमी:


...त्यामुळे हार्दिक पांड्या अन् नताशाच्या आयुष्यावर मोठा परिणाम; घटस्फोटाचं अखेर कारण आलं समोर!