...त्यामुळे हार्दिक पांड्या अन् नताशाच्या आयुष्यावर मोठा परिणाम; घटस्फोटाचं अखेर कारण आलं समोर!
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. मात्र दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय का घेतला. (Photo Credit Social Media)
आता हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Photo Credit Social Media)
हार्दिक पांड्याला खूप ग्लॅमरस जगायला आवडतं आणि नताशाला हे सर्व आवडत नव्हते. ती हार्दिकला सांभाळू शकली नाही. त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढत गेले आणि प्रकरण इतके वाढले की दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit Social Media)
हार्दिकच्या म्हणण्यानूसार नताशाने देखील स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ते शक्य झाले नाही आणि हार्दिकने देखील ग्लॅमरस जगणं सोडलं नाही, त्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit Social Media)
एका रिपोर्ट्सनूसार हार्दिक पांड्याने स्वतःमध्ये कोणताही बदल केला नाही. हार्दिक पांड्याने ते बदलले असते तर नातं वाचवता आलं असतं. हार्दिक पांड्याच्या ग्लॅमरस आयुष्यामुळे त्यांच्या नात्यावर मोठा परिणाम झाला. (Photo Credit Social Media)
नताशाला शांत जीवन जगण्यास आवडतं. त्यामुळे नताशा पूर्णपणे थकली होती. यामुळे दोघांमधील संबंध चांगले राहिले नाही. (Photo Credit Social Media)
घटस्फोट घेण्याबाबतचा निर्णय नताशासाठी खूप कठीण होता. हा निर्णय एका दिवसात किंवा आठवडाभरात घेतला गेला नाही, तर हळूहळू वाढत्या अंतरामुळे तिला हा निर्णय घेण्यास भाग पाडले.(Photo Credit Social Media)
हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. (Photo Credit Social Media)
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.(Photo Credit Social Media)