Malojiraje Chhatrapati : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने कोल्हापूरला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. मालोजीराजे छत्रपती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्षही आहेत. मालोजीराजे छत्रपती गेली दहा वर्षांपासून वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. त्यामुळे या निवडीने खेळाडूंमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. 


काही दिवसांपूर्वीच फिफाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. फेडरेशनच्या अध्यक्षपदी सलग 12 वर्षे अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांचेच वर्चस्व होते. महाराष्ट्राकडून16 वर्षे महासंघावर प्रतिनिधित्व करीत होते. यावेळी मालोजीराजे यांना महाराष्ट्रातून राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्रातून मालोजीराजे यांची सदस्यपदी निवड झाली.



नवीन कार्यकारिणीमध्ये जीपी पल्गुना, अविजित पॉल, पी अनिलकुमार, वलंका नताशा आलेमाओ, मालोजीराजे छत्रपती, मेनला इथेंपा, मोहन लाल, आरिफ अली, के नेबू सेखोसे, लालनघिंगलोवा हमर, दीपक शर्मा, विजय बाली आणि सय्यद इम्तियाज हुसैन यांचा समावेश आहे.


फुटबॉल महासंघावरील बंदी अखेर उठवली


FIFA ने अलीकडेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी अखेर उठवली आहे. सुप्रीम कोर्टाकडून महासंघावरील प्रशासक मंडळ बरखास्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. फीफाने भारतीय फुटबॉल महासंघातील त्रयस्थ हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन 15 ऑगस्ट रोजी बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ही बंदी सुप्रीम कोर्टाने प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यावर फीफाकडून उठवण्यात आली आहे.


फीफाने बंदी उठवल्याने 11 ते 30 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वकप स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फीफाने भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या