एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
...म्हणून महावीर फोगाट यांना बबिताची फायनल पाहता आली नाही!
'माझे वडील पहिल्यांदाच माझा सामना पाहण्यासाठी आले होते. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तिकीट मिळू शकलं नाही.'
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : आज राष्ट्रकुल स्पर्धेतही बबिता कुमारी फोगाट अंतिम सामन्यात पोहचली. पण तिला सुवर्ण पदकाला गवसणी घालता आली नाही. दुसरीकडे तिचे वडील आणि कोच महावीर फोगाट हे 'दंगल' सिनेमाप्रमाणेच बबिताचा अंतिम सामना पाहू शकले नाही. पण यावेळी त्यांना कोणत्या खोलीत बंद करण्यात आलं नव्हतं. तर त्यांना या कुस्तीच्या सामन्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटच मिळू शकलं नाही.
ज्यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' सिनेमा बनवण्यात आला त्या महावीर फोगाट यांना आज राष्ट्रकुल खेळातील बबिताचा अंतिम सामना पाहता आला नाही. ज्यावेळी अंतिम सामन्यात बबिता निकराची झुंज देत होती त्यावेळी महावीर फोगाट असाह्यपणे बाहेर वाट पाहत बसले होते.
या संपूर्ण घटनेनं बबिता फारच दु:खी झाली. 'माझे वडील पहिल्यांदाच माझा सामना पाहण्यासाठी आले होते. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. एका खेळाडूला दोन तिकीट मिळतात. पण यावेळी आम्हाला ते देखील मिळाले नाही. मी माझ्या परिने खूप प्रयत्न केले. पण तरीही त्यांना बाहेरच राहावं लागलं याचं मला वाईट वाटतय. ते जिथे होते तिथे टीव्ही देखील नव्हता.'
टीम प्रमुख विक्रम सिसोदिया यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, 'कुस्तीसाठी आम्हाला जे तिकीट मिळाले होते. ते आम्ही कोच राजीव तोमर यांना दिले होते आणि त्यांचं वाटप करण्याची जबाबदारीही त्यांचीच होती. आम्हाला राष्ट्रकुल महासंघाकडून जे तिकीट मिळाले होते. ते आम्ही संबंधित प्रशिक्षकांकडे दिले होते. आम्हाला कुस्तीचे पाच तिकीट मिळाले होते. जे आम्ही तोमर यांना दिले होते. मला माहित नाही फोगाट यांना तिकीट का मिळाले नाही.'
दरम्यान, फायनलमध्ये बबिताला कॅनडाच्या डायना विकरने पराभूत केलं. त्यामुळे बबिताचं सुवर्णपदक हुकलं. डायनाने बबिताचा 5-2 असा पराभव केला. महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिता कुमारीने सलग तीन विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र सलग तीन कुस्त्या खेळल्यामुळे, बबिता काहीशी दमलेली दिसत होती. त्यामुळे डायना विकरने त्याचा फायदा घेत, पहिल्यापासूनच आक्रमक कामगिरी केली.
डायना आधी 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोघींना 2-2 गुण मिळाल्याने बबिता 2 आणि डायना 3 असे गुण झाले. मात्र अखेरच्या मिनिटात दोघींमध्ये तुफान झटापट झाली. यामध्ये पुन्हा डायनाने 2 गुणांची कमाई करत निर्णायक आघाडी घेतली.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
भारत
निवडणूक
Advertisement