जालना : महाराट्र केसरी स्पर्धेत माती विभागाप्रमाणे गादी विभागातही आज खूप चुरशीचे सामने पाहायला मिळाले. 70 किलो गादी विभागातल्या सेमीफायनल लढतीत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटीलने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीला 4-3 ने हरवत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोपडेने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलवर 2-0 अशी मात करून अंतिम फेरीत धडक दिली आहे.
या गटातील कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीने लातूरच्या आकाश देशमुखचा 7-2 अशा गुणाधिक्याने पराभव करून कांस्यपदक पटकाविले. तर सोलापूरच्या धीरज वाघमोडेनेही साताऱ्याच्या आकाश मानेवर 8-5 अशी मात करून कांस्यपदक जिंकले.
संबधित बातम्या :
महाराष्ट्र केसरी : 61 किलो गटात पुण्याचा निखिल कदम, सांगलीचा राहुल पाटील फायनलमध्ये
मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं पुण्यात आयोजन
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : सागर, आशिष, वेताळ, जोतिबा सुवर्णपदकाचे मानकरी
व्हिडीओ :
माती विभागात पुण्याचा सागर मारकड 57 किलो गटात विजयी | महाराष्ट्र केसरी | जालना | एबीपी माझा
मॅट विभागात आशीष वावरेला 79 किलो गटात सुवर्ण | महाराष्ट्र केसरी | जालना | एबीपी माझा
महाराष्ट्र केसरी : 70 किलो गटात कोल्हापूरचा स्वप्निल पाटील, पुण्याचा अनिकेत खोपडे फायनलमध्ये
एबीपी माझा वेब टीम Updated at: 21 Dec 2018 07:19 PM (IST)