एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरी : तिसऱ्या दिवसाच्या लढतींचा निकाल

तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86 किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

जालना : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (21 डिसेंबर 2018) जालनावासियांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडुंब भरले होते. तिसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील 61, 70 आणि 86  किलो वजनी गटातील सेमीफायनल आणि फायनलच्या लढतीसह 74, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 61 किलो माती विभागात निखिल कदम आणि सांगलीच्या राहुल पाटील यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत निखिलने सुवर्णपदक आपल्याकडे खेचून आणलं. तर राहुल पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 61 किलोच्या गादी विभागात कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने कल्याणच्या जयेश सांगवीला 10-0 अशा फरकाने हरवून सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. 70 किलो गादी विभागात पुण्याच्या शुभम थोरात विरुद्ध स्वप्निल पाटील कोल्हापूर अशा झालेल्या कुस्तीत शुभम थोरातने बाजी मारली. तर, याच वजनी गटात माती विभागातून मछिंद्र निंगुरेला मागे टाकत पुण्याच्या गोकुळवस्ताद तालमीतल्या राम कांबळेने सुवर्णपदक पटकावले. 86 किलोच्या माती विभागात बालाजी येलगुंदेला नमवत कोल्हापुरचा शशिकांत बोगांर्डे सुवर्णवीर ठरला. पुण्याचा अनिकेत खोपडे आणि अहमदनगरचा अक्षय कावरे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यात अक्षय कावरेने बाजी मारत सुवर्णझेप घेतली. शुक्रवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटाचे ड्रॉही पाडण्यात आले. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि डार्क हॉर्स होण्याच्या तयारीत आलेला शिवराज राक्षे यांच्यातली लढत, मुन्ना झुंजुरके विरुद्ध समाधान पाटील, माऊली जमदाडे विरुद्ध संतोष दोरवडे, विक्रम वडतिले विरूद्ध विष्णु खोसे अशा काही चटकादार कुस्त्या आजच्या महाराष्ट्र केसरी विभागात पाहायला मिळाल्या. अंतिम निकाल : 61 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर) द्वितीय-जयश सांगवी (कल्याण) तृतीय-सागर बर्डे (नाशिक) तृतीय-विजय पाटील (कोल्हापूर) 61 किलो माती विभाग प्रथम- निखिल कदम (पुणे) द्वितीय -राहुल पाटील (सांगली) तृतीय-अरुण खेगळे (पुणे) 70 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- शुभम थोरात (पुणे) द्वितीय - स्वप्नील पाटील (कोल्हापूर) 70 किलो माती विभाग प्रथम- राम कांबळे (कोल्हापूर) द्वितीय- मच्छिंद्र निंगुरे (कोल्हापूर) तृतीय-अरुण खेंगळे (पुणे) 86 किलो गादी (मॅट) विभाग प्रथम- अक्षय कावरे (अहमदनगर) द्वितीय -अनिकेत खोपडे (पुणे) तृतीय-भैरु नाते तृतीय-विवेक (सांगली) 86 किलो माती विभाग प्रथम- शशिकांत बोगर्डे (कोल्हापूर) द्वितीय-बालाजी यलगुंदे (जालना) तृतीय- दत्ता नसळे (कोल्हापूर)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar News : IPLमध्ये लखनऊने दिला नाही चान्स… अर्जुन तेंडुलकरचा मोठा निर्णय! BCCIकडून पण मिळाली परवानगी, नेमकं चाललयं काय?
IPLमध्ये लखनऊने दिला नाही चान्स… अर्जुन तेंडुलकरचा मोठा निर्णय! BCCIकडून पण मिळाली परवानगी, नेमकं चाललयं काय?
IPL 2026 Playoff Scenarios : ज्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, तेच आता 'काळ' बनून येणार? टॉप-4 चं गणित बिघडवून 'ही' टीम करणार थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री, जाणून घ्या गणित
ज्यांच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं, तेच आता 'काळ' बनून येणार? टॉप-4 चं गणित बिघडवून 'ही' टीम करणार थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री, जाणून घ्या गणित
RR vs DC Live Score IPL 2026 : पराभवांच्या छायेत दिल्ली, स्टार्क बनणार का गेमचेंजर? राजस्थानसमोर आज निर्णायक सामना
RR vs DC Live Update : पराभवांच्या छायेत दिल्ली, स्टार्क बनणार का गेमचेंजर? राजस्थानसमोर आज निर्णायक सामना
Mitchell Santner News : आयपीएलच्या नादात सँटनरचा 'गेम' झाला! एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, न्यूझीलंडच्या गोटात खळबळ, नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या नादात सँटनरचा 'गेम' झाला! एका चुकीची मोठी किंमत मोजावी लागली, न्यूझीलंडच्या गोटात खळबळ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Pune Express way traffic jam : 1,2,3,4,5..एक्स्प्रेस वेवर धडाधड गाड्या बंद, धडकी भरवणाराVIDEO
Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले
Raj Thackeray Post On Maharashtra Din: हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट, सरकारला घेरलं!
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं
Embed widget