एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या संघाला 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद

विजेतेपदाच्या लढाईआधी साखळी सामन्यात महाराष्ट्राने आधी उत्तराखंडला 48 धावा, गुजरातला 8 विकेट्स आणि दिल्लीला 9 विकेट्सनी पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

नागपूर : महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाने 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. नागपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. 20 षटकांच्या सामन्यात उत्तराखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र संघाने अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण करुन उत्तराखंडचा डाव 18.1. षटकात 91 धावांमध्ये गुंडाळला. त्यामुळे महाराष्ट्रासमोर विजयासाठी 92 धावांचं आव्हान होतं. मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र संघाने हे लक्ष्य 2 विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 8.3 षटकात पार करुन विजेतेपद पटकावलं. या सामन्यात परशुराम देसलेने महाराष्ट्र संघासाठी नाबाद 59 धावा केल्या. व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि डिसेबल्ड स्पोर्टिंग आयोजित 'संविधान कप' राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा नागपूरच्या बुद्ध पार्कमध्ये 8 ते 10 मार्च 2019 या कालावधीत भरवण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि उत्तराखंड या राज्याच्या व्हीलचेअर क्रिकेट संघांचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंचं अपंगत्व 60 ते 90 टक्के होते. खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही व्हीलचेअरवर बसून केलं. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी संकल्प असोसिएशन, दिव्यांग स्पेशल अॅबिलिटी फाऊंडेशन, पाऊल दिव्यांग वेलफेयर फाऊंडेशन यांचा सहभाग होता. विजेतेपदाच्या लढाईआधी साखळी सामन्यात महाराष्ट्राने आधी उत्तराखंडला 48 धावा, गुजरातला 8 विकेट्स आणि दिल्लीला 9 विकेट्सनी पराभूत करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार परशुराम देसले, उत्कृष्ट फलंदाज परशुराम देसले, उत्कृष्ट गोलंदाज विश्वनाथ गुरव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साहिल सय्यद यांना देण्यात आला. तर दिल्ली संघाला शिस्तबद्ध संघाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाने राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेत सलग तीन स्पर्धा जिंकून विजेता संघ बनला. या आधी दिल्लीमध्ये जून 2018 मध्ये झालेल्या भारतीय व्हीलचेअर प्रीमियर लिगचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर उत्तराखंडमध्ये झालेल्या सहा राज्यांच्या राष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. आता नागपूरमधील 'संविधान कप'  जिंकून पुन्हा एकदा चॅम्पियन झाला आहे. महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघ :- रमशे सरतापे (कर्णधार), राहुल रामगुडे (उप कर्णधार), शहीद अन्सारी, परशुराम देसले, विश्वनाथ गुरव, संतोष रंजागणे, राजू पाटील, हाफिज अन्सारी, विनोद गावंडे, साहिल सय्यद, संतोष घोडके, निखिल कडगावकर, निलेश राठोड, दिलीप कांबळे (संघ व्यवस्थापक), मनिष शर्मा (प्रशिक्षक)

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget