एक्स्प्लोर

बॅटिंग आणि विकेटकीपिंगप्रमाणे निवृत्त कधी व्हायचं हेसुद्धा मला कळतं - एमएस धोनी

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही.

नवी दिल्ली : सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. मंगळवारी (काल) झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून भारताने उपांत्यफेरीचे तिकीट मिळवले आहे. परंतु या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार आणि जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटरसिक चिंतेत आहेत. काल झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. या लढतीत रोहित शर्माचे शतक तर लोकेश राहुलने 77 धावांची खेळी करून संघाला 180 धावांची सलामी दिली. त्यानंतर ऋषभ पंतने 48 धावांची आक्रमक खेळी करुन दिली. त्यामुळे भारतीय संघ 350 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. परंतु अखेरच्या षटकात धोनी पुन्हा एकदा संथ खेळला. त्यामुळे भारताला मोठी धावसख्या उभारता आली नाही. धोनीच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शनावर त्याचे चाहतेदेखील नाराज आहेत. धोनी पूर्वीसारखा खेळत नसल्यामुळे त्याच्या टीकाकारांनादेखील त्याच्याविरोधात बोलण्याची आयती संधी मिळाली आहे. "धोनी त्याच्या लौकीकाप्रमाणे खेळत नाही, धोनी खूप धिम्या गतीने खेळू लागला आहे, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटप्रमाणे खेळतोय," अशी टीका त्याच्यावर सुरु आहे. तर अनेकांनी धोनीला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत धोनीच्या जवळच्या मित्रांनी धोनीशी बातचित केली. यावर माही म्हणाला की, "फलंदाजी कशी करायची, यष्टीरक्षण (विकेटकीपिंग) कसं करायचं हे जितकं चांगलं मला कळतं, तितकंच मला निवृत्त कधी व्हायचं हेदेखील कळतं." 2017 मध्येच धोनीच्या निवृत्तीची मागणी होत होती. त्यानंतर धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विराट कोहलीला भारतीय संघाचा कर्णधार बणवण्यात आले. परंतु कोहली आणि धोनीच्या सहकाऱ्यांनीच धोनीला काही काळ संघासोबत राहण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून धोनी 2019 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होईल असे बोलले जात आहे. खेळ माझा : कॅप्टन कूल धोनी खरंच रिटायर होतोय? दरम्यान धोनी विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची बातमी काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिली आहे. स्पर्धेतील अखेरचा सामना खेळल्यानंतर धोनी क्रिकेटला रामराम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वृत्ताला अद्याप धोनी किंवा बीसीसीआयकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु, निवृत्तीसाठी धोनीच्या घरच्या मैदानावर एक सामना खेळवण्यात येईल, अशीदेखील चर्चा सुरु आहे. परंतु भारताने विश्वचषक जिंकला, तर तोच सामना धोनीचा अखेरचा सामना ठरेल, असे म्हटले जात आहे. धोनीच्या निवृत्तीसाठी हीच उत्तम वेळ असेल, असेही काही निकटवर्तीयांनी धोनीला सुचवले आहे. धोनीची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी दक्षिण आफ्रिका – 34 धावा (46 चेंडू) ऑस्ट्रेलिया – 27 धावा (14 चेंडू) पाकिस्तान – 1 धाव (2 चेंडू) अफगाणिस्तान – 28 धावा (52 चेंडू) वेस्ट इंडीज – नाबाद 56 धावा (61 चेंडू) इंग्लंड – नाबाद 46 धावा (31 चेंडू) बांग्लादेश – 35 धावा (33 चेंडू)  आपल्या षटकारानं दुखापतग्रस्त झालेल्या 'त्या' चाहतीला रोहित शर्माकडून कॅप भेट | ABP Majha 87 वर्षांच्या आजीने कोहली आणि रोहितचा घेतला लाडाने मुका | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget