एक्स्प्लोर

"धोनी निवृत्तीबाबत विचार करु नकोस"; भारतरत्न लता मंगेशकर यांचं भावनिक ट्वीट

उपांत्य फेरीतील सामन्यात धोनीने 72 चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह 50 धावांची संथ खेळी केली. यावरून धोनीने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. मात्र ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी धोनीच्या समर्थनार्थ ट्वीट करत त्याने निवृत्ती घेऊ नये असा सल्ला दिला आहे.

मुंबई : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात उपांत्य फेरीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं. उपांत्य फेरीतील सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर आलेल्या महेंद्रसिंग धोनीनेही संथ गतीने खेळी केली.  त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.

मात्र धोनीच्या समर्थनार्थ ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत. लता दीदींनी धोनीला उद्देशून भावनिक ट्वीट केलं आणि त्याचा बचाव केला. "नमस्कार एमएस धोनीजी. माझ्या असं कानावर आलं आहे की तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात. कृपया तुम्ही असा विचार करु नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, निवृत्तीचा विचार तुम्ही मनातही आणू नका", असं भावनिक ट्वीट लता दीदींनी धोनीसाठी केलं आहे.

विराटकडूनही धोनीचा बचाव

धोनीनं त्याच्या भविष्याच्या योजनांविषयी आपल्याला काहीही सांगितलं नसल्याचं कर्णधार विराट कोहलीनेही पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनीनं संथ खेळी उभारली. त्यानं एक खिंड लढवली, पण मोठे फटके खेळण्याचं टाळलं. धोनीच्या या खेळीचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने बचाव केला.

धोनीने निवृत्ती घेऊ नये असं त्याच्या फॅन्सलाही वाटत आहे. धोनीची सध्या भारतीय क्रिकेट संघाला गरज आहे, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळेच धोनीच्या समर्थनार्थ  हा हॅशटॅश सध्या ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये आहे.

न्यूझीलंडनं या सामन्यात टीम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 240 धावांचं आव्हान दिलं होतं. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या 221 धावांचीच मजल मारता आली. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनीनं सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयासाठी शिकस्त केली. जाडेजानं 59 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 77 धावांची खेळी उभारली. धोनीने 72 चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह 50 धावांची खेळी केली.

संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs MI IPL 2026 : शेवटचं षटक राज बावालाच का?, सूर्यकुमार यादवने पराभवानंतरही मानली नाही चूक, कोणावर फोडले खापर?
शेवटचं षटक राज बावालाच का?, सूर्यकुमार यादवने पराभवानंतरही मानली नाही चूक, कोणावर फोडले खापर?
IPL 2026 Points Table : IPL च्या पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट; एका दिवसात 2 संघ OUT! RCB नंबर-1, पंजाब चौथ्या स्थानावर घसरली अन् CSK...
IPL च्या पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट; एका दिवसात 2 संघ OUT! RCB नंबर-1, पंजाब चौथ्या स्थानावर घसरली अन् CSK...
RCB vs MI Rajat Patidar : शेवटच्या चेंडूवर RCB जिंकली... तरीही पाटीदार भडकला! म्हणाला, आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीचे नव्हतो, पण...
शेवटच्या चेंडूवर RCB जिंकली... तरीही पाटीदार भडकला! म्हणाला, आम्ही हा सामना जिंकण्याच्या लायकीचे नव्हतो, पण...
RCB vs MI IPL 2026 Turning Point : तिलक वर्माचा मुर्खपणा ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण, नमन धीरसोबतच्या त्या चुकीने फिरवला अख्खा सामना; नेमकं काय घडलं? पाहा Video
तिलक वर्माचा मुर्खपणा ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण, नमन धीरसोबतच्या त्या चुकीने फिरवला अख्खा सामना; नेमकं काय घडलं? पाहा Video

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget