La Liga Winners 2022 : रिअल माद्रिदने शनिवार एस्पेनयोला 4-0 ने हरवत विक्रम केलाय. रिअल माद्रिदने 35व्यांदा खिताबावर नाव कोरलेय. या सामन्यात रिअल माद्रिदसाठी रोड्रिगोने दोन गोल केले. मारियानो डियाझने आक्रमणात सुरुवात केली. रॉड्रिगोने गोलकीपर दिएगो लोपेझला मागे टाकून क्लिनिकल फिनिशसह एका सेकंदात गोल केला. त्याशिवाय मार्को एसेन्सिओ आणि बदली खेळाडू करीम बेंझेमा यांनी प्रत्येकी एक गोल करून माद्रिदला तीन हंगामात दुसरे लीगचे विजेतेपद मिळवून दिले. शनिवारी मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयानंतर मॅनेजर कार्लो एंसेलोटी यांनीही विक्रमला गवसणी घातली आहे. कार्लो एंसलोटी यूरोपमधील आघाडीच्या पाच लीगमध्ये (इंग्लंड, स्पेन, जर्मनी, इटली आणि फ्रांस) जेतेपद मिळवण्याचा विक्रम केलाय.
रिअल माद्रिदचा 35 वे स्पॅनिश ला लीगा स्पर्धेचे जेतेपद पटकावले. चार गेम बाकी असताना एस्पॅनियोलचा पराभव केला. या विजयासह रिअल माद्रिदचे 81 गुण झाले आहेत. अद्याप चार गेम बाकी आहेत. रिअल माद्रिद प्रतिस्पर्धी सेविलाच्या 17 गुण पुढे आहेत. तर बार्सिलोनापेक्षा 18 गुण पुढे आहे. रिअल माद्रिदने सहा वर्षांत तिसरे विजेतेपद मिळवले. नोव्हेंबरपासून ते अव्वल स्थानावर आहेत. रिअल माद्रिदचा पुढील सामना मल्लोर्का यांच्याशी होणार आहे.
इटालियन व्यवस्थापकाने सेरी ए मध्ये एसी मिलान, इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सी, लीग 1 मध्ये पॅरिस सेंट-जर्मेन आणि बुंडेस्लिगामध्ये बायर्न म्युनिचसह जिंकले. मॅड्रिड सैंटियागो बर्नबेउ स्टेडियममध्ये बुधवारी रिअल मार्दिदचा सामना होणार आहे. चॅपियंस लीग सेमीफायनलच्या दुसऱ्या सत्रात मँचेस्टर सिटीच्या विरोधात आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या सामन्यात माद्रिदचा 4-3 ने पराभव झाला होता.
हे देखील वाचा-