IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल्स चॅलेंज बंगळुरू (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) आमने सामने आले. या सामन्यात राहुल तेवतियाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून विजय मिळवला. परंतु, गुजरातच्या विजयापेक्षा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) अधिक चर्चेत आला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानात आलेल्या मोहम्मद शामी त्याचा रन- अप विसरला. ज्यामुळं त्यानं डोमिनिक ड्रेक्सच्या माध्यमातून इंच टेप मागून घेतला आणि त्याचा रन-अप मोजायला लागला. ज्यामुळं मैदानातील अंपायरही त्याच्यावर भडकले. 


ट्वीट-



आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरातच्या संघानं मोहम्मद शामीला 6.25 कोटीत विकत घेतलंय. त्यानं यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली फ्रँचायझींकडून सामने खेळले आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी शमीनं 85 आयपीएल सामन्यांमध्ये 28.73 च्या सरासरीनं आणि 8.52 च्या इकॉनॉमी रेटनं 92 विकेट्स घेतले होते.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरातच्या संघानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघानं 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर, केवळ एकच सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातचा संघ 16 गुणांसह  गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचलाय. 


मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 8 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियानं महत्वाची भूमिका बजावली



हे देखील वाचा-