Trending News : आजकाल सोश मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होताना दिसताl. कधी पाळीव प्राण्यांचे गोंडस व्हिडीओ, तर कधी जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळता. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. 


सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये जंगलाचा राजा सिंहाचा म्हशीची शिकार करण्याचा प्रयत्न फसला, त्यानंतर मात्र सिंहाची जीव वाचवण्यासाठी पळता भूई थोडी झाली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोळ मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.







साधारणपणे जंगलचा राजा सिंह जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना पाहायला मिळतो. त्यामुळे इतर प्राणी त्याच्यापासून दूर पळतात. पण सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिंह जीव वाचवून पळताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ज्यामध्ये सिंहांचा कळप जंगलात शिकार करताना दिसत आहे. यावेळी ते म्हशींच्या कळपावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.






 


मात्र सिंहांच्या कळपाला म्हशींची शिकार करणे चांगलेच महागात पडताना दिसत आहे. सिंहाच्या हल्ल्यानंतर म्हशींचा संपूर्ण कळप सिंहांच्या कळपावर तुटून पडतो. यामुळे भीतीने सिंहांना पळता भूई थोडी होते. सिंह म्हशींपासून आपला जीव वाचवून पळून जाताना दिसतात.


महत्त्वाच्या बातम्या :