GT Vs RCB: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) सुरु असलेल्या आयपीएल2022 च्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) 6 विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि डेव्हिड मिलरनं (David Miller) महत्वाची भूमिका बजावली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. बंगळुरूच्या डावातील दुसऱ्याच षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिस गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदारनं संघाचा डाव सावरला. या सामन्यात विराट कोहलीनं 58 तर, रजत पाटीदानं 52 धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं छोटीशी 33 धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामुळं बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून सांगवाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद शाम, अल्झारी जोसेफ, राशीद खान आणि लॉकी फॉर्ग्युसन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
बंगळुरूच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिलनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, आठव्या षटकात वानिंदु हसरंगाच्या गोलंदाजीवर वृद्धीमान साहानं विकेट्स गमावली. त्यानंतर साई सुदर्शन फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र, त्यालाही काही खास कामगिरी करता आली नाही. तो 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी मैदानात आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्या फक्त तीन धावा करून माघारी परतला. ज्यामुळं सामना बंगळुरूच्या बाजूनं झुकला. मात्र, गुजरातच संकटमोचक म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरनं आक्रमक खेळी करत बंगळुरूच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला. बंगळुरूकडून शाहबाज अहमद आणि वानिंदु हसरंगा यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या.
हे देखील वाचा-