एक्स्प्लोर
रणजी चषक: राहुलचं धडाकेबाज शतक, गंभीरचं स्थान धोक्यात
विशाखापट्टणम : रणजी चषकात धडाकेबाज शतक ठोकणाऱ्या सलामीवीर के एल राहुलने भारतीय संघात कमबॅक केलं आहे. राहुलचा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी 16 जणांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
रणजी चषकात कर्नाटककडून खेळताना राहुलने आज राजस्थानविरुद्ध दुसऱ्या डावात 106 धावा केल्या. राहुलने पहिल्या डावातही दमदार 76 ठोकल्या होत्या.
राहुलचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता, इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघात पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित झालं होतं.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के एल राहुलला गौतम गंभीरऐवजी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement