एक्स्प्लोर

इम्रान खानच्या शपथविधीला जाणार नाही : कपिल देव

या शपथविधी सोहळ्याला टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव उपस्थित राहू शकणार नाहीत. वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून 18 ऑगस्टला शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्याला टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव उपस्थित राहू शकणार नाहीत. वैयक्तिक कारणांमुळे पाकिस्तानला जाऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कपिल देव एबीपी न्यूजशी बोलत होते. शपथविधी सोहळ्याला न जाणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. माझ्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही. इम्रान खानने शपथविधीसाठी निमंत्रण दिलं आहे, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली. कपिल देव यांच्यासोबतच टीम इंडियाचे माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू आणि सुनील गावसकर यांनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार असल्याचं नवजोत सिंह सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे. आपण एक खेळाडू असल्यामुळे या शपथविधी सोहळ्याला जाणार असल्याचं सिद्धू यांनी सांगितलं आहे. राजकीय नेता म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून या सोहळ्याला जाणार आहे, असं ते म्हणाले. तर सुनील गावसकर यांनी यावर अजून काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा तहरीक ए इंसाफ हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीतील यशाबद्दल कपिल देव यांनी इम्रान खान यांना शुभेच्छाही दिल्या. सोबतच पाकिस्तानने असं धोरण बनवावं, ज्यामुळे उभय देशांमधील संबंध सुधारतील आणि त्यामध्ये क्रिकेट खेळलं गेलं तर आणखी चांगलं आहे, असं कपिल देव म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
IND vs WI 4th T20I Live : श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
Hardik Pandya IPL News : MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget