लखनऊ: भारताने ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लखनौमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियावर शूटआऊटमध्ये 4-2 अशी मात करुन फायनलचं तिकीट मिळवलं.


आता फायलनमध्ये भारत आणि बेल्जियम यांच्या महामुकाबला रंगणार आहे.

खरं तर या सामन्यात टॉम क्रेगनं 14 व्या मिनिटाला गोल करुन ऑस्ट्रेलियाचं खातं उघडलं होतं. पण गुरजंतसिंगनं 42 व्या आणि मनदीप सिंगनं 48 व्या मिनिटाला गोल झळकावून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र लॅकलान शार्पनं 57व्या मिनिटाला गोल डागून ऑस्ट्रेलियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

मग शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू बर्ड आणि लॅकलान शार्पनं गोल करण्याची संधी दवडली. त्यामुळं भारताला 4-2 असा विजय मिळवणं शक्य झालं.