Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाचं ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाला जर्मनीकडून पराभवाचा धक्का बसलाय. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात जर्मनीने भारतीय संघाचा 4-2 च्या फरकाने पराभव केलाय. भुवनेश्वरमध्ये झालेल्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाच स्वप्न जर्मनीने धुळीस मिळवलं आहे. या पराभवासह लागोपाठ दोन वेळा फायनल खेळण्यापासून भारतीय संघ वंचित राहिलाय. 2016 मध्ये भारतीय संघाने बेल्जियमचा पराभव करत खिताब पटकावला होता.
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जर्मनीने पहिल्यापासून वर्चस्व गाजवलं. पहिल्या हाफमध्ये जर्मनीने भारतावर आघाडी मिळवली होती. पहिल्या मिनिटांपासून भारतीय संघ दबावात दिसत होता. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीसाठी एरिक क्लेनलिनने पेनाल्टी कार्नरला गोलमध्ये बदलत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनीने पहिल्यापासूनच भारतीय संघावर दबाव निर्माण केला होता. अखेरपर्यंत जर्मनीने भारतीय संघाला पिछाडीवर टाकलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघानं गोल केला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या सामन्यात भारतीय संघाचं डिफेन्स अतिश कमकुवत दिसत होता. भारताकडून उत्तम सिंह आणि बॉबी सिंह यांनी प्रत्येकी एक एक एक गोल केला.
जूनियर हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने (Indian Hockey Team) उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमला 1-0 ने मात करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. मात्र, उपांत्य सामन्यात जर्मनीनं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. याआधी 20 वर्षांपूर्वी भारतीय संघाने लागोपाठ दोन वेळा जूनियर हॉकी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचा कारनामा केला होता. 2001 मध्ये जर्मनीचा पराभव करत भारतीय संघानं फायनलमध्ये प्रवेश केला होता. जर्मनीच्या संघानं आज हा हिशेब चुकता करत फायनलमध्ये प्रवेश केलाय.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :