Omicron Variant : दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सर्व देश सतर्क झाले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटविरोधात लस प्रभावी आहे का? याबाबत चाचपणी सुरु आहे. अशातच भारतातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉनचा धोका पाहता बूस्टर डोसचा विचार करावा, अशी सूचना केंद्र सरकारला दिली आहे. ओमिक्रॉन हा व्हेरियंट इतर व्हेरियंटच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट जास्त वेगानं म्युटेट होतो. शिवाय याचा तरुणांना अधिक धोका असल्याचं काही शास्त्रज्ञांना अभ्यासात दिसून आलेय. भारतातही ओमिक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. त्यामुळे भारतीय सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय शास्त्रज्ञ या व्हेरियंटवर दिवसरात्र रिसर्च करत आहेत. ‘भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियम’ (SARS-CoV-2 Genomics Consortium, INSACOG, आईएनएसएसीओजी) च्या साप्ताहिक अहवालामध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार करावा, असं म्हटलेय. 

देशातील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, शिवाय 40 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्याचा विचार करावा, असं आयएनएसएसीओजीच्या साप्ताहिक अहवालामध्ये म्हटलं आहे. आयएनएसएसीओजी हे करोना विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे. आयएनएसएसीओजीच्या साप्ताहिक अहवालात असे म्हटलेय की, ज्यांचं लसीकरण झालं नाही, त्या लोकांना ओमिक्रॉनचा अधिक धोका आहे. त्यामुळे ज्यांचं लसीकरण झालं नाही, त्यांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावं. तसेच ओमिक्रॉन हा विषाणू 40 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना बूस्टर डोस देण्याचा विचार करायला हवा. यामध्ये अति जोखीम आणि आजारग्रस्त लोकांना प्राधान्य द्यायला हवं.

Continues below advertisement


आयएनएसएसीओजीने सार्वजनिक प्रवासावरही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिलाय. त्याशिवाय आरोग्य व्यवस्था सक्षम आहेत का? याची पडताळणी करण्याची गरज असल्याचं म्हटलेय. आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्यास त्याबाबत लवकर निर्णय घावा, असेही म्हटलेय.  कोरोना विषाणूच्या प्रकरणांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगही करण्याचा सल्ला दिलाय, जेणेकरून बाधित भागात त्याचा संसर्ग शोधला जाऊ शकेल. चाचण्यांची संख्या, प्रतिबंधात्मक उपाय लागू केले जाऊ शकतात, असे म्हटलेय.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live