एक्स्प्लोर

आला तो चेंडू ठोकला, ईशान किशनने धू धू धुतला!

मुंबईच्या प्रतिहल्ल्यात यष्टिरक्षक ईशान किशननं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं अवघ्या 17 चेंडूंतच आपलं अर्धशतक साजरं केलं.

कोलकाता: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला. ईडन गार्डन्सवरच्या या सामन्यात मुंबईनं कोलकात्याला विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मोठ्या धावसंख्येचं आव्हान आणि प्ले ऑफची तीव्र चुरस यांच्या दडपणाखाली कोलकात्याचा अख्खा संघ अवघ्या 108 धावांत गडगडला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून तब्बल 16 चौकार आणि 14 षटकारांची वसुली केली. त्यामुळं मुंबईला वीस षटकांत सहा बाद 210 धावांची मजल मारता आली. ईशान किशनचा धमाका मुंबईच्या प्रतिहल्ल्यात यष्टिरक्षक ईशान किशननं प्रमुख भूमिका बजावली. त्यानं अवघ्या 17 चेंडूंतच आपलं अर्धशतक साजरं केलं. ईशान किशननं 21 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 6 षटकार ठोकले. किशनने येईल तो चेंडू सीमापार धाडला. त्यामुळे कोलकात्याच्या गोलंदाजांना त्याला नेमकी कशी गोलंदाजी करावी हेच कळत नव्हतं. ज्यावेळी मुंबई इंडियन्सची स्थिती 9 षटकात 2 बाद 62 अशी होती, त्यावेळी ईशान किशन मैदानात उतरला. आल्या आल्याच त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. आला तो चेंडू ठोकला, ईशान किशनने धू धू धुतला! कुलदीप यादव आणि पियुष चावला यांना त्याने 1 सिक्स आणि 3 चौकार ठोकले. ईशान किशन 9 चेंडूत 21 धावा ठोकल्या, त्यावेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या हिटमॅन रोहित शर्माकडे कुणाचं लक्ष नव्हतं. किशनने कुलदीप यादवने टाकलेल्या 14 व्या षटकात चांगलीच धुलाई केली. त्याने चारवेळा चेंडू सीमेपल्याड धाडला आणि अवघ्या 17 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. किशनने नंतर आणखी दोन सिक्स ठोकले. मात्र सातवा सिक्स मारण्याच्या नादात तो सुनिल नरेनच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाकरवी झेलबाद झाला. मात्र तोपर्यंत ईशानने त्याचं काम केलं होतं. अवघ्या 21 चेंडूत ने 62 धावा करत, मुंबईला अवघ्या 5.4 षटकात 82 धावा लुटून दिल्या होत्या. दुसरीकडे सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मानं प्रत्येकी 36 धावांची खेळी उभारली. बेन कटिंग 24, हार्दिक पंड्यानं 19 आणि एविन लुईसनं 18 धावांची खेळी केली. ईशान किशनची इनिंग 0 6 1 4 0 0 4 2 4 1 1 4 1 4 6 6 6 6 0 6 W 21 चेंडूत 62 धावा  मुंबई चौथ्या स्थानी मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 102 धावांनी धुव्वा उडवून आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सलग तिसरा आणि एकूण पाचवा विजय ठरला. मुंबई आणि कोलकात्याच्या खात्यात समसमान दहा गुण आहेत. पण मुंबईनं कोलकात्यावर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट उंचावला. त्याच वेळी या पराभवानं कोलकात्याचा नेट रनरेट ढासळला. त्यामुळं मुंबईला गुणतालिकेत चौथं स्थान मिळवता आलं. सध्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद 16 गुणांसह पहिल्या, चेन्नई सुपर किंग्ज 14 गुणांसह दुसऱ्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. संबंधित बातम्या
मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, केकेआरचा 102 धावांनी पराभव

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians Captain News : मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
मुंबईचा नवा कर्णधार कोण? रोहित, बुमराह की सूर्यकुमार; आज 27 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार मोठा फैसला, हार्दिक पांड्याशी खास संबंध
IND vs NZ 2nd Test Day 1 Stump : कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
कधी भारताचा वरचष्मा, तर कधी न्यूझीलंडचा पलटवार! पहिल्या दिवसाचा खेळ संपला, कोण पडले भारी?
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
अंपायरने श्रीलंकेच्या खेळाडूला NOT OUT देताच राडा; तिलक वर्मा संतापला, वैभव सूर्यवंशीही धावत आला, शाहबाजने डोक्याला हात लावला, काय घडलं?, VIDEO
Mohammed Siraj IND vs NZ 2nd Test : कोच म्हणतो जागतिक दर्जाचा, पण संघात जागाच नाही; सिराजच्या डच्चूवरून नवा वाद; हर्षा भोगले, मोहम्मद कैफ संतापले, कधीही न बोललेले आता सगळं बोलून गेले!
कोच म्हणतो जागतिक दर्जाचा, पण संघात जागाच नाही; सिराजच्या डच्चूवरून नवा वाद; हर्षा भोगले, मोहम्मद कैफ संतापले, कधीही न बोललेले आता सगळं बोलून गेले!

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget