IPL 2022, RR vs LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं लखनौच्या संघाला तीन धावांनी पराभूत केलं. राजस्थानच्या विजयात फिरकीपटू युजवेंद्र चहलनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं चार विकेट्स घेऊन लखनौच्या संघाचं कंबरडं मोडलं. या कामगिरीसह तो आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज ठरलाय. या हंगामात त्यानं 11 विकेट्स घेऊन उमेश यादवकडून पर्पल कॅप हिसकावून घेतली आहे. या हंगामात उमेश यादवनं 10 विकेट्स घेतल्या आहेत.


चहलच्या आधी ड्वेन ब्राव्होनं, लथिस मलिंगा, पीयूष चावला, अमित मिश्रा आणि हरभजन सिंहनं आयपीएलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. लखनौविरुद्ध चहलनं आयुष बदोनीनं, क्विंटन डी कॉक, क्रुणाल पांड्या आणि दुष्मंता चमीराला आऊट करून इतिहास रचला. या कामगिरीसह चहलनं आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. 



आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
1) ड्वेन ब्रावो - 173
2) लासिथ मलिंगा - 170
3) अमित मिश्रा - 166
4) पीयूष चावला - 157
5) हरभजन सिंह - 150
6) युजवेंद्र चहल - 150


मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह राजस्थानच्या संघानं सहा गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. 


हे देखील वाचा-