IPL 2022: आयपीएलच्या आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं मुंबईचा (RCB Vs MI) सात विकेट्स राखून पराभव केला. अनुज रावत बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईला पराभूत करून बंगळुरूनं सलग तिसरा विजय नोंदवला. परंतु, बंगळुरूच्या या विजयापेक्षा विराटच्या (Virat Kohli) एका लेडी फॅन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. बंगळुरू आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान या तरूणीनं भरमैदानात झळकवलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.  


विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. परंतु, त्यानं गेल्या अडीच वर्षापासून एकही शतक झळकावलेलं नाही. विराट कोहली कधी शंभरचा आकडा गाठतोय? याची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उस्तुकता लागली आहे. बंगळुरू आणि मुंबई यांच्या सामन्यादरम्यान शतकाची वाट पाहत असलेल्या विराटच्या एका लेडी फॅन्सनं पोस्टरद्वारे सांगितले की, "जोपर्यंत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वं शतक पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी डेटवर जाणार नाही. तिनं भरमैदानात झळकवलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. 


फोटो-



चुकीच्या निर्णयामुळं विराटचं अर्धशतक हुकलं
बंगळुरू आणि मुंबई यांच्या सामन्यादरम्यान मुंबईचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसनं त्याच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला एलबीडब्लू केलं.  त्यावर विराटनं थर्ड अंपायरकडं दाद मागितली. थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये बॉल एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं.  मात्र, तरीही विराट कोहलीला आऊट घोषित करण्यात आलं. त्यावेळी विराट 48 धावांवर होता.


मुंबईला पराभूत करून बंगळुरूनं सलग तिसरा विजय नोंदवला
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.


हे देखील वाचा-


RCB on Virat Kohli Wicket: विराटला चुकीच्या पद्धतीनं आऊट देण्याच्या निर्णयावर आरसीबीची मोठी प्रतिक्रिया


IPL 2022: चेन्नईच्या 'या' निर्णयावर रवी शास्त्रींनी उपस्थित केले प्रश्न, समोर ठेवली संघाची सर्वात मोठी चूक


RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला