नवी दिल्ली : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) पर्वाची आता समारोपाच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली आहे. आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स बाहेर पडले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. केकेआर आणि राजस्थान रॉयल्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंटससाठी प्लेऑफच्या प्रवेशाचा मार्ग खडतर असून त्यांच्या प्रवेशाची शक्यता जवळपास संपल्यात जमा आहे. आयपीएलच्या महत्त्वाच्या टप्प्यावर विदेशी खेळाडू आगामी टी-20 वर्ल्ड कपची तयारी आणि इतर कारणांसाठी स्पर्धेतून माघार घेत आहेत. यामुळं त्यांच्या संघांच्या कामगिरीवर परिणाम होतोय. इरफान पठाणनं (Irfan Pathan) आयपीएल अर्ध्यात सोडणाऱ्या खेळाडूंना खडेबोल सुनावले आहेत.
इरफान पठाण काय म्हणाला?
यंदाचं आयपीएलचं 17 वं पर्व सुरु झाल्यापासून अनेक खेळाडूंनी विविध कारणांमुळं स्पर्धेतून माघार घेतलीय. टी-20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी आणखी काही खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलीय. इरफान पठाणनं यावर संताप व्यक्त केला आहे. इरफान पठाण आयपीएल स्पर्धा अर्ध्यावर सोडणाऱ्यांना तुम्ही संपर्ण सीझन खेळणार असला तरच या अन्यथा येऊ नका, असं म्हटलं.
कोणत्या खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनं स्पर्धेतून माघार घेतली. आता तो इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेत तो सहभागी होईल. लियाम लिव्हिंगस्टोन यानं देखील पंजाब किंग्जचा संघ सोडून आयपीएलमधून माघार घेतली.
शिखर धवन जखमी असल्यानं त्याच्या ऐवजी पंजाब किंग्जचं नेतृ्त्त्व करणारा सॅम करन आणि जॉनी बेयरस्टो देखील लवकरच मायदेशी परतणार आहेत. पंजाब किंग्जनं काल झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनं पराभूत केलं. पंजाब किंग्जची एक मॅच बाकी असतानाच सॅम करन इंग्लंडला परतणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातून राईसी टॉप्ली आणि विल जॅक्स या दोघांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली. आरसीबीकडून विल जॅक्सनं चांगली कामगिरी केली होती.
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फिल सॉल्ट आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मोईन अली या दोघांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली.
संबंधित बातम्या :
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
IPL 2024 Playoffs : 4 दिवस, 5 संघ अन् 2 जागा... प्लेऑफचं समीकरण सोप्या भाषेत