RR vs RCB : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये आयपीएल 2022 चा दुसरा क्वालीफायर (IPL 2022 Qualifier 2) सामना खेळवण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे तर विजेता संघ 29 मे रोजी गुजरातसोबत दोन हात करणार आहे. क्वालिफायर 2 सामन्यात युजवेंद्र चाहलला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आजच्या सामन्यात एक विकेट घेतल्यास एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू होणार आहे. चाहलला इम्रान ताहिरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इम्रान ताहिरने 2019 मध्ये 26 विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत हा विक्रम ताहिरच्या नावावर आहे. आयपीएल 2022 मध्ये युजवेंद्र चाहलने 15 सामन्यात 17.76 च्या सरासरीने आणि 7.70 च्या इकॉनमीने 26 विकेट घेतल्या आहेत. एक विकेट घेताच चाहल इम्रान ताहिरचा विक्रम मोडणार आहे. सध्या पर्पल कॅपही चाहलकडे आहे. चाहलला आरसीबीच्या वानंदु हसरंगाकडून कडवे आव्हान मिळतेय. हसरंगाने 25 विकेट घेतल्या आहेत. आज दोघेही खेळणार आहेत..त्यामुळे पर्पल कॅप कुणाकडे जाणार? हा चर्चेचा विषय झालाय.
आईपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या?
युजवेंद्र चहल: 26 विकेट
वानंदु हसरंगा: 25 विकेट
कगिसो रबाडा: 23 विकेट
उमरान मलिक: 22 विकेट
कुलदीप यादव: 21 विकेट
हा विक्रमही मोडू शकतो चाहल -
यजुवेंद्र चाहलला आणखी एक विक्रम नावावर करण्याची संधी आहे. आरसीबीविरोधात चाहलने दोन विकेट घेतल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नावावर करु शकतो. सध्या हा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. मिश्राने 154 सामन्यात 166 विकेट घेतल्या आहेत. चहलने 129 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावर?
ड्वेन ब्रावो: 183 विकेट
लसिथ मलिंगा: 170 विकेट
अमित मिश्रा: 166 विकेट
युजवेंद्र चहल: 165 विकेट
पीयूष चावला: 157 विकेट