IPL Purple Cap List 2023 : ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची लढत रंगतदार झाली आहे. ऑरेंज कॅप स्पर्धेत यशस्वी जयस्वाल आणि फाफ डु प्लेलिस यांच्यात काटें की टक्कर आहे.. दोघांमध्ये फक्त एका धावेचे अंतर आहे. तर दुसरीकडे पर्पल कॅपची स्पर्धाही रंगली आहे. पर्पल कॅप सध्या चतुर चलाक चहलच्या डोक्यावर आहे. कोलकात्याविरोधात चार विकेट घेत चहलने पर्पल कॅफवर कब्जा मिळवलाय. याआधी मोहम्मद शमी याच्या डोक्यावर पर्पल कॅप होती. पण ईडन गार्डन्स मैदानावर विकेटचा चौकार लगावत चहलने पर्पल कॅफ हिसकावली आहे. आज मुंबईविरोधात दमदार कामगिरी करत शमी पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्ा करु शकतो. 


पर्पल कॅपची लढत रंगतदर -


यंदाच्या आयपीएलमध्ये पर्पल कॅफची लढत रंगतदार पाहायला मिळत आहे. खासकरुन करुन भारतीय गोलंदाज या स्पर्धेत आघाडीवर आहेत. कोलकात्याविरोधात युजवेंद्र चहल याने विकेटचा चौकार लगावत पर्पल कॅफवर कब्जा मिळावलाय. चहल याने १२ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत. 
दुसऱ्या, तिसऱ्या आणि  चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या गेोलंदाजांच्या प्रत्येकी १७ विकेट आहेत. पण सरस नेट रनरेटच्या आधावार दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा मोहम्मद शमी आहे. तर क्रमांकवर राशीद खानचा समावेश आहे. त्याने १७ विकेट घेतल्या आहेत. चेन्नईचा तुषार देशपांडे याच्या नावावरही १७ विकेट आहेत. पीयूष चावला आणि वरुण चक्रवर्तीच्या नावावर प्रत्येकी १७ विकेटची नोंद आहे. चावलाने ११ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. चावलाने मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती याने सर्वाधीक विकेट घेतल्या आहेत. चक्रवर्ती याने  १२ सामन्यात १७ विकेट घेतल्यात.


चहलच्या नावावर इतिहास -
 राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने कोलकात्याच्या नीतीश राणाला बाद करत मोठा विक्रम केलाय... नीतीश राणा चहलची आयपीएलमधील 184 वी विकेट ठरलाय. चहल याने डेवेन ब्राव्हो याचा विक्रम मोडत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरालय. चहलच्या नावावर सध्या १८७ विकेट आहेत. चहल याने 141 डावात आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. सध्या खेळणाऱ्या गोलंदाजात पीयूष चावला, अमित मिश्रा आणि अश्विन यांच्याकडून चहलला आव्हान मिळू शकते.. पण विकेटचे अंतर जास्त आहे.  


फाफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅप 
सध्या ऑरेंज कॅप रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे आहे. 576 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डू प्लेसिस पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, यशस्वी त्याच्या केवळ एका धावेनं मागे असून तो यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला शुभमन गिल या दोन्ही फलंदाजांच्या मागे आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 469 धावा आहेत.