IPL 2023 Pitch Report : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. 16 व्या हंगामातील 57 वा सामना आज, 12 मे रोजी मुंबईच्या घरच्या मैदानावर  रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता  सामन्याला सुरुवात होणार आहे. मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये किती वेळा सामना रंगलाय... वानखेडेची खेळपट्टी कशी आहे.. सामना कुठे पाहाल अन् कधी कुठे होणार सामना... याबाबत सर्वकाही जाणून घेऊ...


IPL 2023, MI vs GT : मुंबई विरुद्ध गुजरात लढत
गतविजेते गुजरात टायटन्स (GT) वानखेडेच्या मैदानावर आज पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढणार आहे.  यजमान मुंबईचा संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुजरात संघाने अहमदाबादमध्ये मुंबईला 57 धावांनी हरवले होते. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झालाय.  गुजरात संघ सध्या आयपीएल 2023 गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स संघानेही आरसीबीचा पराभव करत पहिल्या चारमध्ये स्थान पटकावलेय.


MI vs  GT Head To Head :  हेड टू हेड, काय स्थिती ? 


मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत 2 वेळा आमना-सामना झाला आहे. यामध्ये मुंबई आणि गुजरात यांनी प्रत्येकी 1 - 1 सामना जिंकला आहे. आकड्याची लढाई बरोबरीत आहे... दोन्ही संघामध्ये आजची लढाई रंगतदार होण्याची शक्यता आहे.


Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. दव पडण्याची शक्यता कमीच दिसतेय. नऊ मे रोजी ज्याप्रमाणे खेळपट्टी होती.. तशीच खेळपट्टी असेल.. येथे 200 धावांचाही यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो.


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
मुंबई (MI) आणि गुजरात (GT) यांच्यात आज 12 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.