Women's IPL Auction 2023 : महिला अंडर-19 विश्वचषक जिंकणारी कॅप्टन शेफाली वर्माला दिल्ली कॅपिट्लसनं खरेदी केले आहे. दोन कोटी रुपयांत दिल्लीने शेफाली ला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वात नुकताच भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. शेफाली वर्मा भारताच्या सिनिअर संघाचाही भाग आहे. शेफाली वर्माला विस्फोटक फंलदाज म्हणून ओळखलं जातं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यातही शेफाली नं निर्णायक फलंदाजी केली होती. शेफाली वर्माने 134.64 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. 


मुंबईनेही लावली होती बोली -  


शेफाली वर्मासाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघात चुरस झाली होती. दोन्ही संघाला शेफाली ला आपल्या संघात घ्यायचं होतं. 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजला सुरु झालेली बोली अखेर दोन कोटी रुपयांवर जाऊन थांबली. दिल्लीने दोन कोटी रुपये खर्च करत शेफाली ला आपल्या संघात सामील केलेय. शेफाली विस्फोटक ओपनिंग फलंदाज आहे. संघाला झटपट सुरुवात करुन देण्यात ती पटाईत आहे. आक्रमक खेळ ही शेफाली ची जमेची बाजू आहे. 






महिला टी20 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन


नुकत्याच झालेल्या महिला टी 20 अंडर 19 वर्ल्डकपमध्ये शेफाली नं भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. शेफाली नं आपल्या विस्फोटक फंलदाजीने टीमला अनेकदा विजय मिळवून दिलाय. शेफाली नं टी20 मधील सात सामन्यातील सात डावात 24.52 च्या सरासरीने आणि 193.26 च्या स्ट्राईक रेटने 172 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये एका अर्धशतकांचा समावेश आहे. 
 
शेफाली चं आतंरराष्ट्री करिअर - 


शेफाली वर्मा भारताच्या टी20, कसोटी आणि वनडे संघाचा भाग आहे. सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात तिने पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत ती भारतीय संघाचा नियमीत भाग आहे. शेफाली ने आतापर्यंत दोन कसोटी, 21 वनडे आणि 52 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीच्या चार डावात शेफाली ने 60 च्या सरासरीने 242 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय 21 एकदिवसीय डावात 531 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. तर 52 टी 20 सामन्यात 134 च्या सरासरीने शेफाली नं 1264 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. 


आणखी वाचा :
Women's IPL Auction 2023 : मराठमोळ्या स्मृतीवर कोट्यवधींची बोली, विराटच्या आरसीबीनं घेतलं ताफ्यात