Virat Kohli in IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. या सामन्यामध्ये विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीकडून (Virat Kohli) चाहत्यांना दमदार खेळीची अपेक्षा होती, पण विराट केवळ नऊ धावांवर बाद झाला. गेला काही काळ विराट आऊट ऑफ फॉर्म असल्याचं पाहायला मिळत आहे. चाहत्यांना त्याच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र विराटची बॅट काहीशी त्याला साथ देताना दिसत नाही आहे. अशातही विराटचे चाहते मात्र त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. विराटच्या वाईट खेळीनंतरही ट्विटरवर विराटच्या चाहत्यांना त्याला पाठींबा देत त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.


खातं न उघडताच बाद
या सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या सलग दोन आयपीएल सामन्यांमध्ये विराट कोहली खातं न उघडताच बाद झाला. राजस्थानने बंगळुरूला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलं आहे.


दरम्यान, विराट कोहलीचे चाहते त्याला सोशल मीडियावर पाठिंबा देताना दिसत आहेत. 






 






 










 


महत्त्वाच्या इतर बातम्या :