IPL 2022, RCB vs RR: रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29  धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. 12 गुणांसह राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या क्रमांकावर घसरले आहे. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...(RCB vs RR, Top 10 Key Points )


आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. जोस बटलर, देवदत्त पडिकल आणि संजू सॅमसनला माघारी धाडले.


एका बाजूला विकेट पडत असताना रियान पराग याने संयमाने फलंदाजी केली. रियान परागने अर्धशतकी खेळी करत संघाला सन्माजनक धावसंख्या उभारली.  परागने 56 धावांची खेळी केली. 


सिराज, हेजलवूड, हसरंगा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 


रियान परागच्या (Riyan Parag) अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत आठ बाद 144 धावा चोपल्या. 


145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेल्या विराट कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. विराट 9 धावा काढून बाद झाला. 


विराट कोहलीनंतर फाफ 23, पाटीदार 16, मॅक्सवेल 0, शाबाज अहमद 18 आणि प्रभुदेसाई 2 धावा काढून बाद झाले. 


मोक्याच्या क्षणी कार्तिक धावबाद झाला. शाबाज अहमद आणि कार्तिक यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले. कार्तिक सहा धावा काढून बाद झाला. कार्तिक बाद झाला अन् तिथेच सामना फिरला. 


आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. आरसीबीकडून फाफने सर्वाधिक 23 धावा काढल्या. आरसीबीचा संपूर्ण संघ 115 धावांत तंबूत परतला. 


राजस्थानकडून कुलदीप सेन याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अश्विनने तीन आणि प्रसिद्ध कृष्णाने दोन बळी घेतले. चहलाला एकही विकेट मिळाली नाही.