IPL 2022, RCB vs RR: रियान परागचे विस्फोटक अर्धशतक, कुलदीप सेन आणि अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 29  धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. 12 गुणांसह राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या क्रमांकावर घसरले आहे. 


राजस्थानच्या गोलंदाजांनी 145 धावांचा बचाव करताना भेदक मारा केली. आरसीबीच्या एकाही फंलदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट घेतल्या. राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाहीत. कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या 23 धावांची खेळी आरसीबीकडून सर्वात मोठी खेळी ठरली. त्याशिवाय विराट कोहली 9, रजत पाटीदार 16, ग्लेन मॅक्सवेल 0, शाबाज अहमद 17, सुयेश प्रभुदेसाई 2, दिनेश कार्तिक 6, हसरंगा 18, हर्षल पटेल 8, मोहम्मद सिराज 5 राजस्थानच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा संपूर्ण संघ 115 धावांत संपला. राजस्थानकडून कुलदीप सेन याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अश्विनने तीन आणि प्रसिद्ध कृष्णाने दोन बळी घेतले. चहलाला एकही विकेट मिळाली नाही. 


आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पण रियान परागच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकांत आठ बाद 144 धावा उभारल्या. युवा खेळाडू रियान पराग याने एकाकी झुंज देत नाबाद 56 धावांच्या जोरावर संघाला एका आव्हानात्मक लक्ष्यापर्यंत पोहोचवलं आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी जोस बटलरला स्वस्तात माघारी धाडलं. पडिक्कललाही रोखलं. संजूने काही काळ क्रिजवर टिकून 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना राजस्थानची अडचणीत आला होता. रियान परागने दमदार आणि संयमी अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 56 धावा झळकावल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या 144 च्या पुढे गेली. आरसीबी संघाने सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. यावेळी मोहम्मद सिराजने अतिशय महत्त्वाचे विकेट्स घेत क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. आरसीबीकडून सिराज, हेझलवुड आणि हसरंगा यांनी प्रत्येकी दोन तर हर्षल पटेलने एक विकेट घेतली.