IPL 2022 Points Table : पुण्याच्या एमसीए मैदानार झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 29 धावांनी पराभव केला. या विजयासाह गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे, होय... आरसीबीचा पराभव करत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स दुसऱ्या क्रमांकावर घसरलाय. पराभवानंतर आरसीबी अव्वल चारमधून बाहेर गेलाय. 

राजस्थान रॉयल्सने आठ सामन्यात सहा विजय मिळवलेत. राजस्थानने 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कब्जा मिळवलाय. राजस्थानला यंदा फक्त दोन पराभवाचा सामना करवा लागलाय. दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या गुजरात संघाचेही 12 गुण आहेत. नेटरनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. पण बुधवारी गुजराताचा सामना होणार आहे. हा सामना जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल होण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्या करु शकतो. 

राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, हैदराबाद आणि लखनौ संघ पहिल्या चारमध्ये आहेत. तर आरसीबी पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. आरसीबीने नऊ सामन्यात पाच विजय आणि चार पराभव स्वीकारलेत. पंजाब सहाव्या तर दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि चेन्नई अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. तर एकही सामना न जिंकणारा मुंबईचा संघ तळाशी आहे. मुंबईचे सलग आठ पराभव झाले आहेत. 

पाहा गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव  नेट रन रेट गुण
1 राजस्थान 8 6 2 0.561 12
2 गुजरात 7 6 1 0.396 12
3 हैदराबाद 7 5 2 0.691 10
4 लखनौ 8 5 3 0.334 10
5 आरसीबी 8 5 3 -0.572 10
6 पंजाब 8 4 4 -0.419 8
7 दिल्ली 7 3 4 0.715 6
8 कोलकाता 8 3 5 0.080 6
9 चेन्नई 8 2 6 -0.538 4
10 मुंबई 8 0 8 -1.000 0

गुणतालिकामध्ये राजस्थान संघाने अव्वल स्थानावर कब्जा केलाय. त्याशिवाय पर्पल आणि ऑरेंज कॅपवरही राजस्थानच्या खेळाडूंनी कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे (499 धावा) आहे तर पर्पल कॅप यजुवेंद्र चहलच्या (18 विकेट) डोक्यावर आहे...