KL Rahul IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आयपीएलचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात फ्रेंचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील. केएल राहुल आणि ऋषभ पंत या खेळाडूंचा समावेश आहे. 


लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मधून बाहेर झाल्यानंतर KL राहुल आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघाचा भाग असेल. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राहुल आरसीबीमध्ये जाऊ शकतात, अशी अटकळ वाढत आहे. जिथे त्याने 2013 मध्ये त्याच्या IPL कारकिर्दीला सुरुवात केली होती. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राहुलला लिलावात खरेदी करण्यासाठी आधीच 30 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे.


केएल राहुलने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने बेंगळुरूसाठी चार हंगाम खेळले, ज्यामध्ये त्याने 19 सामन्यांमध्ये 417 धावा केल्या. आरसीबीने आयपीएल 2025 साठी विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल यांना 5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आरसीबीच्या पर्समध्ये अजूनही 83 कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत या टीमने राहुलसाठी लिलावात 30 कोटी रुपयांपर्यंत बोली लावण्याची तयारी केली असल्याचा दावा केला जात आहे.


केएल राहुल 2016 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आणि त्याच हंगामात आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद बंगळुरूविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत होते. त्या सामन्यात एसआरएचने प्रथम खेळताना 208 धावांची मोठी खेळी केली होती. दुसरीकडे, बंगळुरूला निर्धारित 20 षटकांत केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. त्या सामन्यात विराट कोहलीने 54 आणि राहुलने 11 धावा केल्या होत्या. राहुलने IPL 2016 मध्ये 14 सामने खेळताना 397 धावा केल्या होत्या.


विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का


केएल राहुल हा आरसीबीच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराटनंतरही तो सर्वात मोठा दावेदार आहे. राहुल कर्नाटकचा असून याआधीही तो आरसीबीकडून खेळला आहे. राहुलने पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आहे. त्याने 3 पैकी 2 हंगामात लखनऊला प्लेऑफमध्ये नेले. 


केएल राहुलचा आयपीएल रेकॉर्ड


केएल राहुलची बॅट गेल्या काही काळापासून शांत दिसत आहे. न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील अवघ्या एका सामन्यानंतर राहुलला संघातून वगळण्यात आले. आता राहुल बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. राहुल ऑस्ट्रेलियात फॉर्ममध्ये परतेल अशी आशा चाहत्यांना आहे. तर राहुलचे आयपीएलमधील आकडे खूपच प्रभावी आहेत. आतापर्यंत या खेळाडूने आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आहेत. राहुलने 123 डावात फलंदाजी करताना 4683 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 134.6 राहिला आहे. आयपीएलमध्ये राहुलने 37 अर्धशतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत.


हे ही वाचा -


Rishabh Pant IPL 2025 Auction : 'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स सोडली...', ऋषभ पंतचा खळबजनक खुलासा, ट्विट करत नक्की म्हणाला काय?