Mumbai Indians IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव नुकताच जेद्दाह येथे आयोजित करण्यात आला होता. जिथे सर्व 10 संघांनी आगामी हंगामासाठी आपली तगडी टीम बनवली. अनेक संघांनी विक्रमी बोली लावून खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवले. दरम्यान, इशान किशनला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले नाही. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाने इशान किशनचा आपल्या संघात समावेश केला आहे. अशा परिस्थितीत इशान किशन यावेळी भगव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.


मुंबईने इशानला का नाही घेतले?


आयपीएल लिलावापूर्वी इशान किशनला मुंबई इंडियन्स संघानेही कायम ठेवले नव्हते. त्यांनी केवळ पाच खेळाडूंना कायम ठेवले. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश होता. पण लिलावादरम्यानही मुंबई इंडियन्सने इशान किशनला घेण्यात फारसा रस दाखवला नाही. 


इशान किशनची मूळ किंमत 2 कोटी होती. यंदाच्या लिलावात 11.25 कोटी रुपयांना विकला गेला आहे. पण बोली 3.20 कोटींवर पोहोचल्यानंतर मुंबई इंडियन्सने किशनवर बोली लावणे थांबवले होते. मुंबई इंडियन्सने इशान किशनशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे हार्दिक पांड्याने त्याच्याबद्दल एक खुलासा केला आहे.




मुंबई इंडियन्सने रविवारी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटले आहे की, इशान हा संघाची ऊर्जा आहे. पण आम्ही त्याला कायम ठेवू शकलो नाही, तेव्हा आम्हाला माहित होते की त्याला लिलावात परत संघात आणणे कठीण होईल. कारण आम्हाला माहित आहे की तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे.


हार्दिकला इशानची उणीव भासणार?


हार्दिक पांड्याने इशान किशनला मुंबई इंडियन्सचा पॉकेट डायनॅमो असे म्हटले आहे. इशान किशन सहा वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग होता. जिथे संघाने 2018 ते 2024 पर्यंत दोन आयपीएल विजेतेपदे जिंकली. हार्दिक पांड्याने त्याच्याबद्दल सांगितले की, तो ड्रेसिंग रूमचे वातावरण नेहमीच चांगले ठेवतो. तो अनेकांना हसवायचा. हे प्रेम आणि जिव्हाळा त्याच्यासाठी अगदी स्वाभाविक होता. आम्ही त्याला मिस करू. इशान किशन तू मुंबई इंडियन्सचा पॉकेट डायनॅमो होतास आणि आम्हा सर्वांना तुझी आठवण येईल.


हे ही वाचा -


टीम इंडियाचे समीकरण झाले सोपे! जिंकावे लागणार फक्त इतके सामने, बाकीच्या संघाचे काय हाल? जाणून घ्या A टू Z