Preity Zinta apologise to Shreyas Iyer : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मेगा लिलाव यावेळी जेद्दाह सौदी अरेबिया येथे झाला. हा लिलाव दोन दिवस चालला. या मेगा लिलावात फ्रँचायझींनी 182 खेळाडूंवर 639.15 कोटी रुपये खर्च केले. ज्यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांना विक्रमी बोली लावून खरेदी करण्यात आले.
मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, मात्र काही मिनिटांतच ऋषभ पंतने त्याला मागे टाकले. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले असेल, पण त्याला इतके पैसे मिळणार नाहीत. हे आम्ही म्हणत नसून पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटा हे सांगत आहे.
काय म्हणाली प्रिती झिंटा?
खरंतर, जेव्हा प्रिती झिंटाला विचारण्यात आले की, तुमच्या संघातील एका खेळाडूला 26 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले आहे. 2008 मध्ये तुम्हाला काय वाटले? यावर प्रिती झिंटाने उत्तर दिले की, मला नेहमी वाटत होते की आयपीएलमध्ये जे काही होईल ते रेकॉर्ड तोड होईल. इथेच तिने श्रेयसला पूर्ण रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले.
यादरम्यान प्रिती झिंटा श्रेयस अय्यरला 26 कोटी रुपये मिळाल्याबद्दल बोलले, तेव्हा मुलाखतकाराने तिला 26.75 कोटी रुपये किंमत असल्याची आठवण करून दिली. इथेच प्रिती झिंटाने गंमतीने श्रेयसची माफी मागितली आणि टॅक्समध्ये काही पैसे नक्कीच कापले जातील याची आठवण करून दिली.
या लिलावातून पंजाब किंग्जने केवळ एक नव्हे तर तीन अशा अष्टपैलू खेळाडूंना खरेदी केले आहे, ज्यांच्याकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे. फ्रँचायझीने मार्को यान्सेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस यांना विकत घेतले. हे तिघेही अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत. स्टॉइनिसने लखनऊ सुपर जायंट्ससाठी गेल्या मोसमात सामना जिंकून देणारी कामगिरी केली होती, तर मार्को जॅन्सनने सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाचा -