मुंबई : आगामी वर्षात होणाऱ्या आयपीएलची चर्चा आतापासून चालू झाली आहे. आगामी आयपीएलसाठी लिलावाची प्रक्रिया पार पडली. यावेळच्या लिलावात अनेक विस्मयकारक प्रकार पाहायला मिळाले. लिलावात अवघ्या 13 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi Struggle) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघाने तब्बल 1.10 कोटी रुपये मोजून करारबद्ध केले. दुसरीकडे मास्टल ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अवघे 30 लाख रुपये देऊन करारबद्ध करण्यात आले. त्या तुलनेत मूळच्या वैभवसाठी राजस्थानने थेट 1 कोटीपेक्षा जास्त पैसे मोजले. त्यामुळे या तेरा वर्षाच्या तरण्या क्रिकेटरची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.असे असतानाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने तसेच त्याच्या कुटुंबाने केलेला संघर्ष सध्या चर्चेचा विषय़ ठरतोय. त्याच्या वडिलांनीही मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. 


वडिलांनी सांगितला मुलासाठीचा संघर्ष 


वैभव सूर्यवंशी अवघा 13 वर्षांचा आहे. मात्र तो सर्वांना चकित करणारं क्रिकेट खेळतो. रणजी क्रिकेटमध्ये त्याने देदिप्यमान कामगिरी करून दाखवलेली आहे. त्यामुळेच त्याच्या क्रिकेटमधील गतीची आयपीएलनेही दखल घेतली. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 1.10 कोटी रुपये देऊन करारबद्ध केले. त्याचे हे यश समोर येताच त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलासाठी काय-काय केलं, याबाबत सगळं सांगिलतं आहे. मुलाला क्रिकेट खेळता यावे, त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी 2021 साली त्यांच्या गावातील जमीन विकली होती. 


अजूनही कुटुंब आर्थिक अडचणीत


वैभव हा मूळचा बिहार राज्यातील समस्तीपूर येथील मोतीपूर या छोट्या गावातून पुढे आलेला आहे. आपल्या मुलाचे हे यश पाहून संजीव सूर्यवंशी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुरुवातीच्या काळात आम्हाला अनेक आर्थिक अडचणी आल्या. मात्र आम्हाला आमच्या मुलावर विश्वास होता. त्यामुळेच मुलाने क्रिकेट खेळावे यासाठी मी मोतीपूर येथील माझी जमीन विकली.  अजूनही माझा परिवार आर्थिक अडचणीतूनच जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. आता वैभव आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. परिणामी या संधीमुळे कुटुंबाचं भाग्य बदलेल, अशी आशा संजीव सूर्यवंशी यांना आहे. 


वडिलांनी दाखवले बोन टेस्टचे रिपोर्ट


दरम्यान, वैभवचा सर्व पातळ्यांवरील संघर्ष पाहून अनेकांनी त्याच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र वैभवला आयपीएलच्या लिलावात 1.10 कोटी रुपये मिळाल्याने अनेकांनी त्याच्या वयाबाबत शंका उपस्थित केली आहे. मात्र संजीव सूर्यवंशी यांनी थेट बोन टेस्टचे रिपोर्ट्स दाखवून मुलाच्या वयाबाबतचा संभ्रम दूर केला आहे. 


हेही वाचा :


IPL मध्ये करोडोची बोली, 13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी डोळ्यात खुपला, वयाबद्दल आरोप होताच, वडिलांची सडेतोड भूमिका; नेमकं काय म्हणाले?


IPL Mega Auction 2025 : पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अनसॉल्ड राहिलेल्या अर्जुन तेंडुलकरची लाज 'या' संघाने वाचवली !


IPL Mega Auction : सरफराज खानच नशीब फुटकं! IPL 2025 मेगा लिलावात राहिला अनसोल्ड; पण धाकट्या भावावर पैशांचा पाऊस