IPL Mega Auction Sarfaraz Khan Unsold And Musheer Khan Sold : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अतिशय मनोरंजक बोली पाहायला मिळाली. अनेक दिग्गज खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली पण काही खेळाडू विकले गेले नाहीत. यामध्ये भारतीय कसोटी क्रिकेटपटू सरफराज खान मेगा लिलावादरम्यान विकला गेला नाही. मात्र, त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान लिलावात नक्कीच विकला गेला. मुशीर खानचा पंजाब किंग्जने त्यांच्या संघात समावेश केला होता. अशा परिस्थितीत सरफराज खान स्वत: विकला गेला नाही तर त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान नक्कीच विकला गेला.
सरफराज खानला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. याशिवाय त्याचा भाऊ मुशीर खान याला पंजाब किंग्जने लिलावादरम्यान विकत घेतले. मुशीर खानची मूळ किंमत 30 लाख होती आणि पंजाबने त्याला त्याच्या मूळ किमतीवर खरेदी केले. इतर कोणत्याही संघाने मुशीर खरेदी करण्यात रस दाखवला नाही.
सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान करणार आयपीएलमध्ये पदार्पण
सरफराज खानच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 441 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 138.24 आहे. त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. मुशीर खानने दुलीप ट्रॉफी दरम्यान 181 धावांची शानदार इनिंग खेळून चर्चेचा विषय बनला होता. तेव्हापासून आयपीएल 2025 च्या मेगा लिलावादरम्यान त्याला खरेदी केले जाऊ शकते अशी चर्चा होती. मुशीरसाठी फारशी महागडी बोली नसली तरी त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावादरम्यान दीपक चहरला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. चेन्नई सुपर किंग्जनेही त्याला विकत घेण्यास रस दाखवला होता. परंतु मुंबई इंडियन्स मागे हटण्यास तयार नव्हते आणि शेवटी त्यांनी बाजी मारली. तर आरसीबीने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.
तर दुसरीकडे, 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (IPL Auction Youngest Cricketer Vaibhav Suryavanshi) याने खळबळ उडवून दिली आहे. यावेळी तो आयपीएल मेगा लिलावात प्रवेश करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. पण त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले.
हे ही वाचा -