Shubhman Gill Sister : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर (RCB) गुजरातच्या (GT) सामन्यात अनेक गोष्टी पहायला मिळाल्या. विराट कोहलीचे (Virat Kohli) शतक आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) विजयी षटकारासह अनेक गोष्टींनी या सामन्याची रंगत वाढवली. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने आणखी एक शतक झळकावून रविवारी एम. चिन्नास्वामी मैदानावर बंगळूरचा सहा विकेट्सने पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी शुभमन गिलची बहीण शहनील गिलही (Shahneel Gill) पोहोचली होती. या सामन्याचे फोटो शहनीलने सोशल मीडियावर पोस्ट केले त्यानंतर काही वेळातच ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
शुभमन गिलची बहिण सोशल मीडियावर ट्रोल
गिलची बहीण शाहनीलने इंस्टाग्रामवर सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली शाहनील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या हँडलवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. शुभमनच्या नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये शहनील तिच्या मैत्रिणींसोबत पोहोचली होती. हे पाहून नेटकऱ्यांनी शुभमन आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
कोण आहे शहनिल गिल? जाणून घ्या...
शुभमन गिलचे त्याच्या बहिणीसोबत नातं घट्ट आहे, हे त्यांच्या इंस्टग्रामवरील पोस्टवरुन समजतं. शाहनील गिलने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट शाळेतून शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी तिने चंदीगडच्या मेहरचंद महाजन या महाविद्यालयात प्रेवश घेतला. तिने 2018-2019 मध्ये रेड रिव्हर कॉलेज पॉलिटेक्निकमधून मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.
आरसीबीच्या पराभवानंतर आरसीबीचे चाहते चवताळले
आरसीबीचा अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने सहा विकेटने पराभव केला. 'करो या मरो'च्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. विराट कोहलीच्या शतकावर गिलचे शतक भारी पडले. गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने आरसीबीचा पराभव केला. हा सामना आरसीबी चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण, पुन्हा एकदा आरसीबीचे आयपीएल ट्रॉफी विजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.
शिवीगाळ करत आक्षेपार्ह पोस्ट
त्यानंतर चाहत्यांनी लाजीरवाणी कृत्य केलं. आरसीबीच्या चाहत्यांनी शुभमन गिलच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ करत आक्षेपार्ह पोस्ट केल्या. शुभमन गिल याच्या शतकामुळे आरसीबी प्लेऑफमधून बाहेर गेली, असा समज करत चाहत्यांनी गिलच्या बहिणीला शिव्या दिल्या. दरम्यान, शुभमन गिलच्या बहिणीबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अकाऊंटवर कारवाई करण्यात येणार आहे.