Sourav Ganguly to be Tripura Tourism Brand Ambassador : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) त्रिपुराचा पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर (Brand Ambassador of Tripura Tourism) होण्यास तयार झाला आहे. त्रिपुराचे पर्यटन मंत्री (Tripura Tourism Minister) सुशांत चौधरी (Sushanta Chowdhury) यांनी सौरव गांगुलीची त्याच्या कोलकाता येथील निवासस्थानी भेट घेतली. सुशांत चौधरी यांनी गांगुलीला त्रिपुराचा पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव सौरव गांगुलीने मान्य केला आहे. मंत्री सुशांत चौधरी यांनी सांगितलं की, लंडनहून परतल्यानंतर सौरव गांगुली त्रिपुरा सरकारशी संपर्क साधणार आहे.


भारताचा माजी कर्णधार त्रिपुराचा पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर


दिग्गज खेळाडू सौरव गांगुली याला त्रिपुराचा पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे. गांगुलीने टुरिझम ब्रँड ॲम्बेसेडर होण्यास होकार दिला आहे. त्रिपुराचे पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांनी मंगळवारी, 23 मे रोजी सौरव गांगुली यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोलकाता येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर गांगुलीनं प्रस्ताव मान्य केला आहे. सौरव गांगुलीला त्रिपुराचा पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याची माहिती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ट्विट करून दिली आहे.






मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली माहिती


त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, "भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याचा आमचा प्रस्ताव स्वीकारणं ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आज त्यांच्याशी फोनवरून संभाषण झालं." त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पुढे लिहिलं आहे, "मला खात्री आहे की सौरव गांगुलीमुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नक्कीच चालना मिळेल." 


सौरव गांगुलीची उच्चस्तरीय बैठक


त्रिपुराच्या पर्यटन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुास, सौरव गांगुलीने मंगळवारी कोलकाता येथील बेहाला येथील निवासस्थानी पर्यटन मंत्री सुशांत चौधरी आणि इतर अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यामध्ये पर्यटन मंत्र्यांसह पर्यटन सचिव आणि संचालक उत्तमकुमार चकमा आणि तपनकुमार चकमा उपस्थित होते. पर्यटन मंत्री यांनी सांगितलं की, 'आपल्या त्रिपुरा पर्यटनाला जगासमोर नेण्यासाठी भरपूर प्रसिद्धी आणि चांगल्या ब्रँडिंगची गरज आहे, त्यामुळे आम्हाला जगभरात ओळखले जाणारे लोकप्रिय ब्रँड अॅम्बेसेडर आणि माजी भारतीय क्रिकेट संघाची गरज होती. यासाठी सौरव गांगुली यांच्यापेक्षा लोकप्रिय व्यक्ती अधिक कोण असू शकणार नाही.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :


GT All Out : धोनीच्या चेन्नईची ऐतिहासिक कामगिरी! आयपीएलमध्ये गुजरात पहिल्यांदा ऑल-आऊट