IPL 2023 Impact Player Rule : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे.  शुक्रवारपासून आयपीएलचा रनसंग्राम सुरुवात होणार आहे. आयपीएल अधिक रंजक होण्यासाठी यंदा काही नवे नियम आणले आहेत. नो-वाइड बॉलवर DRS घेता येणार आहे, आयपीएल पुन्हा एकदा होम आणि अवे फॉर्मेट होणार आहे. त्याशिवाय इम्पॅक्ट प्लेअरही असणार आहे. पाहूयात याबाबत सविस्तर माहिती... 


बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलपासून नवीन नियम लागू केले आहेत. या नियमामुळे संघाच्या पराभव आणि विजयात मोठा फरक पडू शकतो. या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) म्हणून वापर करू शकतो. ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' असं म्हटलं जात असून हा खेळाडू म्हणून, कर्णधार 4 पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसह बदलू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी 'इम्पॅक्ट प्लेअर'ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.


 प्रत्येक डावात दोन DRS वापरता येतात.. यंदापासून  वाइड आणि नो-बॉलचाही रिव्ह्यू घेता येणार आहे. महिला प्रीमियर लीग स्पर्धेत याचा वापर करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत कौर हा नवा नियम वापरणारी पहिली खेळाडू ठरली. झेल बाद झाल्यावर, फलंदाज अर्धी खेळपट्टी ओलांडली की नाही, नवीन फलंदाज स्ट्राइक घेतील. शेवटचा चेंडू असेल तर तो स्ट्राइक घेणार नाही. 


IPL 2023 चे काही नवीन नियम
निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.


यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.


नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करु शकतात. यापूर्वी नाणेफेकीआधी कर्णधाराला संघ द्यावे लागत होते. आता नाणेफेकीनंतर अंतिम खेळाडूंची यादी देता येणार आहे. 


फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम ची नावे देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.


आयपीएल 2023 फॉरमॅट
आयपीएलच्या 10 संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे.
गट निश्चित करण्यासाठी ड्रॉचा वापर केला गेला, ज्याने निर्धारित केले की दोन गटांपैकी कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध एकदा आणि कोणाविरुद्ध दोनदा खेळेल.
गट टप्प्यात, प्रत्येक संघ त्याच्या गटातील इतर चार संघांशी दोनदा खेळेल (एक होमग्राऊंड आणि एक अवेग्राऊंडवर खेळेल), इतर गटातील चार संघ प्रत्येकी एकदा आणि उर्वरित संघ 2 सामन्यात खेळतील. अशा प्रकारे प्रत्येक संघ 14 सामने खेळेल.
आयपीएल पॉईंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर विजेत्या संघाला 2 गुण मिळतील. पराभूत संघाला एकही गुण मिळणार नाही आणि नंतर सामना अनिर्णित राहिला किंवा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.
प्लेऑफ गटाचे सामने पूर्वी जसे होत होते त्याच पद्धतीने होतील.