CSK : आयपीएलच्या रनसंग्रम सुरुवात होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअयवर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. चेन्नईच्या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार धोनी स्वत: चाळीशीपारचा आहे. इतर खेळाडूंचेही वय जास्त आहे. त्यामुळे चेन्नईला डॅडीज आर्मी म्हटले जाते... चेन्नईमधील खेळाडूंचे सरासरी वय ३४ इतके आहे. २०२१ मध्ये चेन्नईच्या संघातील १३ खेळाडूंचे वय तीस पेक्षा जास्त होते. याच वर्षी त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली होती. खेळ आणि वयाचा काही संबंध नसल्याचे एकप्रकारे चेन्नईने दाखवून दिले होते. पण यंदा चेन्नईला वयामुळे नव्हे तर अष्टपैलू खळाडूमुळे ओळखले जाईल. चेन्नईच्या संघाचे खास वैशिष्ट म्हणजे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा होय.. संघात एकापेक्षा एक सरस अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यातच यंदा इंग्लंडचा बेन स्टोक्स संघासोबत जोडला गेल्याने चेन्नईची ताकद आणखी वाढली आहे..
रविंद्र जाडेजा, मोईन अली, शिवम दुबे, दीपक चाहर, बेन स्टोक्स, मिचेल सँटरनर यासारखे दिग्गज अष्टपैलू खेळाडू चेन्नईच्या संघाची ताकद आहेत. रविंद्र जाडेजा लयीत असल्याचे आपण आताच पाहिलेय. ऑस्ट्रेलियाविरोधात जाडेजाने अष्टपैलू खेळी केली होती. त्याशिवाय मोईन अली कोणत्याही क्रमांकावर फटकेबाजी करु शकतो... स्टोक्सकडेही तगडा अनुभव आहे. शिवम मावी मधल्या फळीत दर्जेदार फलंदाजी करतो. तर तळाला दीपक चाहर विस्फोटक फलंदाजी करण्यात माहीर आहे. मोईन अलीने २०२१ मध्य पाचशेपेक्षा जास्त धावा आणि १९ विकेट घेतल्या होत्या. तर गेल्या वर्षी शिवम दुबेने दीडशेच्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला होता. चेन्नईच्या ताफ्यात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच आता स्टोक्समध्ये आणखी ताकद वाढली आहे.
चेन्नईसाठी मागील हंगाम खराब गेला होता. चेन्नईला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ चषक उंचावण्यासाठी मैदानात उतरेल. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यांच्याकडून दमदार सलामी मिळेल.. दोघांनी आतापर्यंत चेन्नईल विस्फोटक सलामी दिली आहे. अंबाती रायडू,मोईन अली आणि शिवम दुबे यांच्या जोडीला आता बेन स्टोक्सची साथ मिळणार आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजा लयीत दिसत आहे. चौकार षटकारांचा पाऊस पाडेल. तसेत धोनी आणि दीपक चाहर हेही धावांचा पाऊस पाडण्यास तयार आहेत. चेन्नई संघाचा फलंदाजीचा क्रम कसा असेल... बेन स्टोक्स कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार ईंहे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सची प्लईं ११ कशी असेल -
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, शिवम दूबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाचं वेळापत्रक, कुणाबरोबर अन् कधी होणार सामना -
धोनीनंतर कर्णधार कोण?
हा धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा आहे. अशात महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा याची चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्जचा आगामी कर्णधारपदाच्या शर्यतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. याचे कारण तो एक भारतीय खेळाडू आहे आणि त्यामुळे तो कॅप्टन असताना संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फारशी अडचण येणार नाही. दुसरीकडे, गायकवाड याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, तो डॉमेस्टीक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार असून महाराष्ट्र संघाची कामगिरीही चांगली असल्याचं दिसून आलं आहे. कर्णधार असताना त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली असल्याने त्याला कर्णधारपदाचा एक तगडा उमेदवार मानलं जात आहे.
यंदा चेन्नईचे वेळापत्रक कसे आहे...
31 मार्च 2023- चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटंस- नरेन्द्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
2 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स- चेपक स्टेडियम, चेन्नई
8 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई
12 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsराजस्थान रॉयल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
17 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर
21 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsसनराइजर्स हैदराबाद, चेपक स्टेडियम, चेन्नई
23 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, ईडेन गार्डेन स्टेडियम, कोलकाता
27 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स, जयपुर
30 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
4 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स, इकाना स्टेडियम, लखनऊ
6 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
10 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
14 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, चेपक स्टेडियम, चेन्नई
20 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली