Man Rides Scooter in Middle of Pitch: क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा सर्वांना हैराण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडच्या क्लब क्रिकेट सामन्यातही अशाच एका घटनेचं दर्शन घडलं. ज्यात एक तरूण किड्स स्कूटर घेऊन मैदानात शिरला. ज्यामुळं काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ इंग्लंडच्या बार्मी आर्मीनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. 


सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु, ही घटना 30 एप्रिलला झाल्याचं समजत आहे. 30 एप्रिलच्या दिवशी सोटन युनिव्हर्सिटी क्रिकेटच्या ट्वीटर हॅंडलवर या घटनेचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोच्या कॅप्शन लिहिले होते की "पॉम्पी बॉईज आपले स्वागत आहे. परंतु, जॉब सेंटर दुसऱ्या बाजूला आहे.


व्हिडिओ-



 
भारतातही घडली होती अशी घटना
भारतातही अशाप्रकारची घटना घडली होती. दरम्यान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश 2017 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये एक व्यक्ती कार घेऊन मैदानात घुसला होता. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तिला अटक केली होती. या घटनेच्या वेळी गौतम गंभीर, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत मैदानात उपस्थित होते. त्यावेळी खेळाडूंच्या सुरक्षतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. संबधित व्यक्ती मैदानात शिरल्यानंतर सामना थांबवण्यात आला होता. परंतु, खेळपट्टी पाहून पंचांनी सामना पुन्हा सुरू केला होता. 


बीसीसीआयचा लोगो दाखवत लॉर्ड्स मैदानावर अज्ञात व्यक्तीची एन्ट्री
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट एक गमतीशीर घटना घडली होती. एक चाहता थेट मैदानात आला होता आणि भारतीय संघाचा सदस्य असल्याचे भासवत होता. हे पाहून मैदानावरील खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही.