IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळाला. सामन्यात मुंबईचा 52 धावांनी मोठा पराभव झाला असला तरी मुंबईचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान या अप्रतिम कामगिरीनंतरही बुमराह मात्र आनंदी नसल्याचं त्याने सांगितल. पण एक खास गोष्ट त्याने यावेळी शेअर केली.


यादगार होता सामना


सोमवारी बुमराहने त्याच्या टी20 कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दाखवल्यानंतर एक शेअर करत यावेळी त्याने या चेंडूच्या मदतीने पाच विकेट्स घेतले त्या चेंडूचा फोटो शेअर करत, खास कॅप्शन दिलं. या चेंडूवर बुमराहने टाकलेली सामन्यातील स्पेल 4-1-10-5 या आकडेवारीच्या रुपात लिहिली होती. या चेंडूच्या फोटोला त्याने, 'काल रात्रीच्या निकालाने मी निराश आहे, पण संध्याकाळ यादगार होती.' असं कॅप्शन दिलं आहे.



कोलकात्याविरुद्ध बुमराहचा संपूर्ण स्पेल-


पहिली ओव्हर-  4, 0, 1, 0, 0, 0
दुसरी ओव्हर-   0, W, 2 ,1, W, 1
तिसरी ओव्हर-  W, 0, W, W, 0, 0
चौथी ओव्हर-    0, 0, 0, 0, 0, 1


आयपीएलमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत बुमराहचा समावेश समावेश
जसप्रीत बुमराह आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. या यादीत अल्झारी जोसेफ (6/12), सोहेल तन्वीर (6/14), अॅडम झम्पा (6/19) आणि अनिल कुंबळे (5/5) यांचा समावेश आहे. या यादीत जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 10 धावांत 5 बळी घेतले आहेत. त्याने आणखी एक विकेट घेतली असती तर तो आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला असता.


हे देखील वाचा-