IPL 2022 Playoff prediction: गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants) आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans) आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) लखनौच्या संघाची जबाबदारी संभाळत आहे. गुजरात  आणि लखनौच्या संघानं आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचपार्श्वभूमीवीर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह कोणता संघ प्लेऑफमध्ये पहिलं स्थान मिळवणार? याची भविष्यवाणी केली आहे. 


लखनौ आणि गुजरातनं प्रत्येकी 8-8 सामने जिंकले आहे. परंतु, रनरेट चागंला असल्यामुळं आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, गुजरातचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ प्लेऑफमधील स्थान निश्चित करेल. दरम्यान, हरभजन सिंहच्या मते आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये कोणता संघ सर्वात प्रथम पोहोचणार? हे जाणून घेऊयात.


हरभजन सिंह काय म्हणाला?
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहनं गुजरातच्या संघाला पाठिंबा दर्शवला आहे. लखनौच्या संघाला पराभूत करून गुजरातचा संघ आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरेल. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ चांगली कामगिरी करत आहे.लेगस्पिनर राशिद खानही सध्या फॉर्मात आहे. तसेच आशिष नेहराच्या मार्गदर्शनामुळं संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. गुजरातला पराभूत करणं इतर संघाला कठीण ठरत आहे. 


दोन्ही संघाची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ अव्वल स्थानी आहे. यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं 11 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले आहेत. तर, गुजरातनं 11 सामन्यापैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, आठ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघाची कामगिरी एकसारखीच आहे. परंतु, लखनौचा रनरेट चांगला असल्यानं संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. तसेच आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हे देखील वाचा-