Gujarat Titans, IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनौ या दोन नव्या संघाचा समावेश करण्यात आला होता. गुजरातने हार्दिक पांड्या आणि राशिद खान या दोन खेळाडूंच्या आजूबाजूला आपला संघ तयार केला. आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी झालेल्या लिलावात गुजरातने अनेक खेळाडूंवर बोली लावली. यामधील काही खेळाडूंनी गुजरात संघाला निराश केलेय. त्यांची कामगिरी पाहून गुजरातने त्यांना घेऊन चूक केली का? असा सवाल उपस्थित होतोय.. पाहूयात त्या तीन खेळाडूबद्दल... 


मॅथ्यू वेड - 
ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडसाठी गुजरात संघाने 2.40 कोटी रुपये खर्च केले होते. पण मॅथ्यू वेडला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. मॅथ्यू वेडने गुजरातसाठी पाच सामन्यात सलामीची भूमिका पार पाडली. या पाचही सामन्यात मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. मॅथ्यू वेडने पाच सामन्यात फक्त 68 धावा केल्या आहेत. 


विजय शंकर - 
आयपीएलच्या 15 व्या हंगामात 3D प्लेअर विजय शंकर फ्लॉप ठरलाय. गुजरातने विजय शंकरसाठी 1.4 कोटी रुपये खर्च केले होते. विजय शंकर संधी मिळालेल्या चार सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. विजय शंकरने चार सामन्यात 4.75 च्या सरासरीने फक्त 19 धावा केल्या आहेत. विजय शंकरची कामगिरीपाहून गुजरातने मोठी चूक केल्याचे बोलले जातेय... 


वरुण एरॉन - 
वेगवान गोलंदाज वरुण एरॉनला घेऊनही गुजरातने मोठी चूक केली... कारण.. वरुणला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.. या सामन्यात वरुणला फक्त दोन विकेट घेता आल्या. यादरम्यान त्याने प्रति षटक 10.40 धावा खर्च केल्या. 


गुजरातची कामगिरी -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने आपल्या पहिल्याच हंगामात दमदार कामगिरी केली. गुजरातने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. या आठ विजयाचे आठ शिल्पकार आहे, हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही.. हीच गुजरातची प्रमुख ताकद आहे..