LSG Andy Flower IPL 2023 : यजमान हैदराबादला लखनौने शनिवारी सात विकेटने पराभूत केले होते. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजीवेळी वाद झाला होता. लखनौच्या आवेश खान याने फेकलेल्या चेंडूवरून वाद झाला होता. आवेश खान याने फेकलेला चेंडू मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला होता. लखनौच्या संघाने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली.. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी हा निर्णय चुकीचे असल्याचे सांगत मैदानावरील पंचाचा निर्णय बदलला.. त्यानंतर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केली. अनेकांनी ट्वीट करत पंचांच्या निर्णायावर खंत व्यक्त केली. 


लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू टाकला, ज्याला पंचांनी नो बॉल दिला.  त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने पंचांच्या निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. चेंडूचा आढावा घेतला, त्यामध्ये  आवेश खानचा चेंडू नो बॉल असल्याचे स्पष्ट दिसत होते, कारण चेंडू स्टम्पपेक्षा जस्त उंचीने जात होता.  परंतु  थर्ड अंपायरने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला आणि नो बॉल नसल्याचे म्हटले. त्यानंतर स्टेडिअममधील उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी गोंधळ घातला लखनौच्या डगआऊटच्या दिसेने काही तरी फेकले.. या गोंधळामुळे सामना थोडावेळ रोखण्यात आला होता. यादरम्यान लखनौचे कोच अँडी फ्लॉवर यांनी लाजीरवाणे कृत्य केलेय. याप्रकरावरुन पंचांशी हुज्जत घालताना अँडी फ्लॉवरने मिडल फिंगर दाखवली.. अँडी फ्लॉवर यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी लखनौ आणि एँडी फ्लॉवरवर टीका केली आहे.   










 "पंच चुकीच्या निर्णयासाठी एवढा वेळ घेतात का?" 
टॉम मूडी यांनी पंचांच्या निर्णायावर टीका करताना म्हटले की,  'चुकीच्या निर्णयासाठी पंच इतका वेळ कसा घेऊ शकतात?'   पंचांनी नो बॉल न देण्याच्या निर्णयाने टॉम मूड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  टॉम मूडी व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लेनघननेही ट्विट केले आहे. मिशेल मॅकक्लेनघननेही टॉम मूडी यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.  मिशेल मॅकक्लेनघन यांने ट्विट करत म्हटले आहे की, 'पंचांचा नो बॉल न देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता.'