CSK vs KKR Playing Eleven: IPL 2023 मध्ये आज म्हणजेच 14 मे, रविवारी डबल हेडर सामने खेळले जातील. आजच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे संघ आमनेसामने असतील. या दोघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. या दोघांमधील या स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी झालेला सामना चेन्नईने जिंकला होता.


चेन्नईचा संघ 12 सामन्यांमध्ये 15 गुणांसह प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारी आहे. तर दुसरीकडे केकेआर केवळ 10 गुणांसह उर्वरित दोन सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केकेआरला इतर संघांच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. 


चेन्नई विरुद्ध कोलकाता हेड टू हेड 


आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 18 आणि केकेआरनं फक्त 9 जिंकले आहेत. तसेच, या दोघांमधील आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये चेन्नईनं 7 आणि कोलकातानं फक्त 2 सामने जिंकले आहेत.


चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे संभाव्य संघ : 


चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ 


एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आकाश सिंह, मोइन अली, भगत वर्मा, दीपक चाहर, डेवोन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हँगरगेकर, रवींद्र जाडेजा, सिसंडा मगाला, अजय मंडल, मथीशा पथिराना , ड्वेन प्रीटोरियस, अजिंक्य रहाणे, शॅक रशीद, अंबाती रायडू, मिचेल सेंटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, महेश तीक्ष्णा


कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य संघ 


नीतीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह, एन जगदीसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेविड वीज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंह, आर्या देसाई आणि जॉनसन चार्ल्स


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.